मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kaumudi Walokar: 'आई कुठे काय करते'मधील आरोहीने खऱ्या आयुष्यात केली नव्या प्रवासाला सुरुवात

Kaumudi Walokar: 'आई कुठे काय करते'मधील आरोहीने खऱ्या आयुष्यात केली नव्या प्रवासाला सुरुवात

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 02, 2024 09:11 AM IST

Aai Kuthe kay karte: मालिकेत ओरीही हे पात्र साकारणाऱ्या कौमुदी वलोकरचा साखरपुडा झाला आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Kaumudi Walokar
Kaumudi Walokar

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून 'आई कुठे काय करते' पाहिली जाते. या मालिकेने गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या मनात विशेष घर करुन असल्याचे दिसत आहे. आता या मालिकेतील आरोहीने खऱ्या खुऱ्या आयुष्यात बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेत आरोही हे पात्र अभिनेत्री कौमुदी वलोकर साकारत आहे. तिची आणि यशची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत आहे. नुकताच कौमुदीने तिच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. तिने आकाश चौकशेशी साखरपुडा केला आहे. या साखपुड्याला काही मोजक्याच लोकांना बोलावण्यात आले होते. मालिकेतील काही कलाकार देखील तेथे उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.
वाचा: शेफाली शाहचा 'थ्री ऑफ अस' कसा आहे? वाचा रिव्ह्यू

कौमुदीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने क्रिम रंगाची साडी नेसली आहे. त्यावर सुंदर असे गळ्यातले घातले आहे. या लूकमध्ये कौमुदी अतिशय सुंदर दिसत आहे. तर आकाशने देखील क्रिम रंगाचा झब्बा आणि कुर्ता घातला आहे. दोघेही एकमेकांसोबत आनंदी दिसत आहेत. हे फोटो शेअर करत कौमुदीने, “या वर्षाच्या शेवटी आम्ही आमचा नवा अध्याय सुरू करत आहोत” असे कॅप्शन दिले आहे.

कौमुदीच्या साखरपुड्याच्या पोस्टवर कलाकार मंडळीसह तिचे चाहते तिला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत. अभिनेता अभिषेक देशमुख, अश्विनी महांगडे, कृतिका देव, अक्षया गुरव, नेहा शितोळे अशा अनेक कलाकार मंडळींनी कौमुदी आणि आकाशला शुभेच्छा दिल्या आहेत. माहितीनुसार, कौमुदीचा होणारा नवरा पीएचडी धारक आहे. तो शिक्षणसाठी कॅलिफोर्नियाला गेला होता.

WhatsApp channel