मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'आई कुठे काय करते'मधील अभिनेता दिसणार 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये

'आई कुठे काय करते'मधील अभिनेता दिसणार 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 26, 2024 05:09 PM IST

'आई कुठे काय करते' मालिकेतील सर्वच कलाकार कायम चर्चेत असतात. आता या मालिकेत काम करणारा एक अभिनेता नव्या मालिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे.

'आई कुठे काय करते'मधील अभिनेता दिसणार 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये
'आई कुठे काय करते'मधील अभिनेता दिसणार 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका कायमच चर्चेत राहिलेली मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने महाराष्ट्रारातील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील एक कलाकार आता झी मराठी वाहिनीवरील मालिकेच दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. आपण आजवर अनेकदा पाहिले आहे की स्टार प्रवाह वाहीनवरील मालिका या कायमच झी मराठी वाहिनीवरील मालिकांना आवाहन देत असतात.

'आई कुठे काय करते' मालिकेतल काम करणारा अभिनेता अद्वैत कडणे हा सध्या चर्चेत आहे. अद्वैतने 'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीची मुलगी ईशाच्या पहिल्या प्रियकराची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका प्रेक्षकांच्या कायमच चर्चेत राहिली आहे. आता अद्वैतने नव्या मालिकेत दिसणार असल्याचे सांगितले आहे. पण तो स्टार प्रवाह वाहिनीवरील नाही तर झी मराठी वाहिनीवरील मालिकेत झळकणार आहे.
वाचा: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातनं होळीनिमित्त घेतला खास उखाणा, पाहा व्हिडीओ

अद्वैत कोणत्या मालिकेत दिसणार?

अद्वैत कडणे हा लवकरच 'नवरी मिळे हिटलरला' या झी मराठी वाहिनीवरील मालिकेत दिसणार आहे. तो लीलाची धाकटी बहिण रेवतीच्या बॉयफ्रेंडची भूमिका साकारणार आहे. त्याच्या या व्यक्तीरेखेचे नाव विक्रांत असे आहे. आता प्रेक्षकांना मालिकेतील विक्रांतच्या भूमिकेची आतुरता लागली आहे.
वाचा: टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमारची मजेशीर होळी, व्हिडीओ पाहून येईल हसू

'नवरी मिळे हिटलरला' मालिकेविषयी

'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत अभिनेता राकेश बापट महत्त्वाच्या भूमिकेत काम करत आहे. त्याच्या या नव्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच मालिकेची कथा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे.

अद्वैतच्या कामाविषयी

अद्वैतने यापूर्वी काही मालिकांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये 'आई कुठे काय करते', 'जाऊ नको दूर बाबा!', 'फुलपाखरू', 'अग्निहोत्र 2' चा समावेश आहे. आता त्याच्या या नव्या मालिकेविषयी सर्वजण उत्सुक आहेत

WhatsApp channel