छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत माया हे पात्र सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसले. माया हे पात्र अभिनेत्री अक्षया गुरवने साकारले होते. अक्षयची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली. पण पात्र मालिकेत फार दिवस टिकले नाही. काही दिवसातच अक्षयाला मालिकेला रामराम ठोकावा लागला. आता अक्षयाने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अक्षयाने नुकताच 'हंच मीडिया' या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला “मध्यंतरीच्या काळात इंडस्ट्रीपासून तू दूर होतीस का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने, “हो… मी सलग किंवा एकापाठोपाठ एक चित्रपट केले नाहीत. पण, आजवर जी कामे केली ती उत्तम होती. या सगळ्या भूमिका वेगळ्या धाटणीच्या होत्या आणि मी ती निवडल्या. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात वाईट काळ आणि संघर्षाचा काळ असतोच. तसाच माझ्याही आयुष्यात हा काळ आला होता. तेव्हाच माणूस स्वत:च्या पायावर उभा राहायला शिकतो. गेल्यावर्षी माझ्या नवऱ्याचे ऑपरेशन झाले होते. आम्ही दोघेही एकाच इंडस्ट्रीत काम करतो. त्यामुळे त्याचे ऑपरेशन झाल्यानंतर जवळपास ५ ते ६ महिने मी घरी होते. त्या काळात माझ्याकडे काही कामच नव्हते” असे उत्तर दिले.
वाचा: रेखा अन् जया सोडून महाराष्ट्रीयन मुलीच्या प्रेमात होते अमिताभ बच्चन, मित्राने केली पोलखोल
अक्षयाने मुलाखतीमध्ये पुढे काही गोष्टी आणखी सांगितल्या. “तो काळ माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. मी लोकांकडे काम मागत होते. मी त्यांना सांगायचे की, ‘प्लीज मला काम द्या.’ त्या काळात मी मिळेल ते काम करण्यासाठी तयार होते. कारण, प्रत्येक कलाकारासाठी काम हे कायमच महत्त्वाचे असते. त्या मधल्या काळात मला एका शोसाठी ऑफर आली होती. मोठे चॅनेल आहे त्यामुळे मी त्या चॅनेलचे नाव घेणार नाही. त्यांनी मला फायनल केले, लूक टेस्ट, मॉक शो झाले, संपूर्ण प्रक्रिया पार पडली आणि अचानक आदल्या रात्री त्यांनी मला फोन करून सांगितले की तुझ्याबरोबर आम्ही काम करणार नाही. आम्ही त्या पात्रासाठी दुसरी अभिनेत्री कास्ट केली आहे” असे अक्षया म्हणाली.
वाचा: मयूरी देशमुखचा 'लग्नकल्लोळ' पाहिलात का? नाही ना मग घर बसल्या ओटीटीवर पाहा
हा प्रसंग घडल्यानंतर अक्षयाला फार वाईट वाटले होते. ती ज्या मालिकेत काम करत होती तिने तीही सोडली होती. अक्षयावर सर्वात जास्त कठीण काळ आला होता. पण नंतर ती या सगळ्यातून बाहेर पडली.
संबंधित बातम्या