मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  संध्याकाळची मालिका दुपारी बघितली जाईल का? ‘आई कुठे काय करते’च्या बदललेल्या वेळेवर ‘अनिरुद्ध’ म्हणतो...

संध्याकाळची मालिका दुपारी बघितली जाईल का? ‘आई कुठे काय करते’च्या बदललेल्या वेळेवर ‘अनिरुद्ध’ म्हणतो...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 04, 2024 10:23 AM IST

इतके वर्ष दररोज संध्याकाळी प्रेक्षकांच्या भेटीला येणारी‘आई कुठे काय करते’ ही मालिका आता वेळ बदलल्यामुळे प्रेक्षकांवर याचा काय परिणाम झाला, या संदर्भात ‘अनिरुद्ध’ने एक पोस्ट शेअर केली आहे.

संध्याकाळची मालिका दुपारी बघितली जाईल का? ‘आई कुठे काय करते’च्या बदललेल्या वेळेवर ‘अनिरुद्ध’ म्हणतो...
संध्याकाळची मालिका दुपारी बघितली जाईल का? ‘आई कुठे काय करते’च्या बदललेल्या वेळेवर ‘अनिरुद्ध’ म्हणतो... (HT)

आई कुठे काय करते’ या मालिकेने छोट्या पडद्यावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या मालिकेने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील ‘अरुंधती’, ‘अनिरुद्ध’, ‘संजना’ यांच्यासह इतर सगळ्याच पात्रांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं होतं. इतके वर्ष दररोज संध्याकाळी प्रेक्षकांच्या भेटीला येणारी ही मालिका आता वेळ बदलल्यामुळे प्रेक्षकांवर याचा काय परिणाम झाला, या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. यामधून त्यांनी त्यांचा एक अनुभव शेअर केला आहे.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील ‘अनिरुद्ध’ म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मिलिंद गवळी यांनी लिहिलं की, ‘आई कुठे काय करते’आता सोमवार ते शनिवार दुपारी अडीच वाजता.जवळजवळ सव्वाचार वर्ष आमची ही मालिका संध्याकाळी साडेसात वाजता यायची. ही मालिका इतकी लोकप्रिय होती की, संध्याकाळी साडेसात वाजता असंख्य घरांमध्ये स्टार प्रवाह चॅनल लागलेला असायचं, या चार वर्षात मी असंख्य लोकांना भेटलो, असंख्य कुटुंबांना भेटलो. सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की, आमच्याकडे“आई कुठे काय करते” ही मालिका आवर्जून बघितली जाते. त्यावेळेला कुणीही दुसरं चॅनल लावत नाही. आयपीएल असलं तरी सुद्धा साडेसात वाजता“आई कुठे काय करते“ ही मालिका बघितली जायची.आता १८ मार्चपासून हा निर्णय घेण्यात आला की, आमची ही मालिका संध्याकाळी साडेसातच्या ऐवजी दुपारी अडीच वाजता दाखवण्यात येईल.’

ऐकून छान वाटलं!

पुढे त्यांनी लिहीले की, ‘संध्याकाळची बघितली जाणारी मालिका दुपारी बघितली जाईल का, असा एक मनामध्ये प्रश्न येत होता. पण आता दोन आठवडे झाले आणि मी ज्या ज्या लोकांना भेटतोय, त्यातल्या बऱ्याचशा बायका मला सांगतात की‘आम्ही आता दुपारी मालिका बघायला सुरुवात केली आहे बरं का!’मला ऐकून छान वाटलं. आणि माझ्या असं ही ऐकण्यात आलं आहे की दुपारच्या वेळेचा टीआरपी पण अतिशय चांगला आहे.मला असं वाटतंय ज्यांना ज्यांना ही मालिका आवडते आणि जे आवर्जून ही मालिका बघतात, त्यांच्यासाठी वेळेचं काही बंधन नाहीये. संध्याकाळी असो दुपारी असो किंवा मग हॉटस्टारवर असो, बघणारे हे आवडीने बघतातच’.

राष्ट्रीय पुरस्कार जिंकून पल्लवी जोशी हिने खिल्ली उडवणाऱ्या दिग्दर्शकाची बोलती केली बंद! वाचा...

इतक्या लवकर कशी संपेल ही गोष्ट?

‘मला खरंच स्टार प्रवाहचं,राजन शाहींचं, नमिताचं, सतीश राजवाडे यांचं, दिग्दर्शकांच्या टीम्सचं, क्रियेटिव्ह टीमचं माझ्या सहकलाकारांचं पूर्ण युनिटचं कौतुक करावसं वाटतं, उत्तम काम करायचीकान्सिस्टन्सी, क्रियेटिव्ह माइंड…बऱ्याच लोकांना असं वाटलं होतं की ही मालिका खूप चालली आहे, आता अजून पुढे हे काय दाखवणार आहेत?पण या मालिकेचा कलाकार म्हणून प्रत्येक वेळेला माझ्या हातात जेव्हा स्क्रिप्ट येते, स्क्रीन प्ले येतो, माझी स्वतःची काम करायची उत्सुकता वाढत जाते.आणि माणसांच्या आयुष्यावर आधारलेली गोष्ट, ही इतक्या लवकर कशी संपू शकेल, जसं आपल्या सगळ्यांचे आयुष्यामध्ये सतत काही ना काहीतरी घडत असतं, तसंच या देशमुख कुटुंबामध्ये आपली उत्कंठा आणि उत्सुकता वाढवणारा घडत असतं.आजही मला करताना तेवढीच मजा येते आहे’, असं मिलिंद गवळी म्हणाले.

IPL_Entry_Point