सध्या संपूर्ण देशात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंतच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. येत्या १२ जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न होणार आहे. दरम्यान, एका मराठमोळ्या अभिनेत्रीने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.
अनंत आणि राधिकाच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. त्यामध्ये हॉलिवूडमधील लोकप्रिय गायक जस्टिन बिबरने देखील परफॉर्मन्स दिला. या परफॉर्मन्ससाठी त्याने जवळपास ८३ कोटी रुपये घेतले.
दरम्यान, जिओ मोबाईल रिचार्ज देखील महागले आहेत. अनेक क्रिएटर्सनी यावर मीम्स देखील बनवले आहेत. आता या मराठमोळ्या अभिनेत्रीने यावर केलेली पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
ही अभिनेत्री दुसरीतिसरी कोणी नसून ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली गौरी कुलकर्णी आहे. तिने सोशल मीडयावर मजेशीर पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.