'आई कुठे काय करते' मालिकेत आरोहीची एण्ट्री झाल्यापासून अनेक वेगवेगळी येताना दिसत आहेत. यश हा आरोहीच्या प्रेमात असल्याचे दिसत आहे तर दुसरीकडे अनिश आणि आरोहीची चांगली मैत्री पाहून ईशाला त्रास होतो. कांचन आजीला देखील आरोही आवडत नाही. आता यशने सर्वांसमोर प्रेमाची कबुली दिली आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही यश आणि आरोहीपासून होते. घराच्या अंगणात यश आरोहीचा हात पकडतो आणि प्रेमाची कबूली देतो. 'हा हात मी धरलाय कारण तुझा हात माझ्या हातात आयुष्य भरासाठी हवा आहे. अर्थात तुझी इच्छा आणि परवानगी असेल तर' असे यश म्हणतो. त्यावर आरोही 'नाही. यश आता हे पुन्हा नको. मला या सगळ्याची भीती वाटते. अचानक तू हे सगळं' असे उत्तर देते. कांचन आजी हे सगळं पाहातात. ते यशला धमकावतात ती आरोही तुझ्या आयुष्यात कशी येते तेमी पाहाते. तुला मी सांगेल त्या मुलीशी लग्न करावे लागेल. या सगळ्याला यश स्पष्ट नकार देत निर्णय सांगतो. त्यानंतर ईशा देखील यश चुकतो आणि या सगळ्याला आरोही दोषी असल्याचे सगळ्यांना सांगते.
वाचा: सापाच्या विषाची नशा केल्या प्रकरणी एल्विश यादवची ३ तास चौकशी
दुसरीकडे अरुंधती आणि आशुतोषला या सगळ्या गोष्टी अनिश सांगतो. अरुंधतीला ईशा चुकीची वागते याची जाणीव होते. अनिश देखील सर्वांना सांगतो की ईशाला आणायला कोणीही जायचे नाही. तिला यायचे असेल तर ती यावेळी येईल. या सगळ्यावर तोडगा म्हणून आरोही घर सोडण्याचा निर्णय घेते. अरुंधती आणि आशुतोष तिला समजावण्याचा प्रयत्न करतात. मात्र ती थांबायला तयार नसते. आता आरोही खरच थांबणार का? काय असेल यशचा निर्णय? ईशा घरी जाणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना आगामी भागात मिळणार आहेत.