मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte 9th Jan: दोन दिवसात होणार यश-आरोहीचा साखरपुडा, संजनाची काय असेल प्रतिक्रिया?

Aai Kuthe Kay Karte 9th Jan: दोन दिवसात होणार यश-आरोहीचा साखरपुडा, संजनाची काय असेल प्रतिक्रिया?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 09, 2024 02:57 PM IST

Aai Kuthe Kay Karte 9th Jan Serial Update: 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा…

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

'आई कुठे काय करते' मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत यशने आरोहीशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे गौरीला कळताच तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत संजनाला कळताच तिने अरुंधती आणि आरोहीला या घटनेच्या दोषी असल्याचे म्हटले. तसेच गौरीला पुन्हा परदेशात पाठवून दिले. आता मालिका एका रंजन वळणावर पोहोचली आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात आशुतोष हा मनूला सोडण्यासाठी शाळेत जातो. तेथे तो जाऊन मायाला मनूपासून लांब राहण्यास सांगतो. तसेच तिला 'कुटुंबाशी संबंधीत काही प्रश्न विचारु नकोस, माझ्या मुलीकडे लक्ष देण्यासाठी आम्ही खंभीर आहोत' असे बजावून सांगतो. अरुंधती आशुतोषला शांत करते. त्यानंतर ते दोघे आपापल्या कामाला लागतात.
वाचा: दीड वर्षे विचार केला; लग्नाच्या १४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा घटस्फोट, पतीने केला शिक्कामोर्तब

अरुंधती घरी येते तेव्हा तेथे यश आणि आरोही आधीच आलेले असतात. यशला रडताना पाहून अरुंधतीला वाईट वाटते. ती त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. तसेच संजनाचा राग साहजिक आहे देखील पटवून देण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर यशने दोन दिवसात साखरपुडा करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगतो. ते ऐकून केळकर कुटुंबीय खूश होतात. त्यानंतर यश घरी जातो आणि सगळ्यांना त्याचा निर्णय सांगतो. त्याच्या या निर्णयावर कांचन आजी काहीच प्रतिक्रिया देत नाहीत. बाकी सगळे त्यांच्या लग्नाची तयारी करण्यास सुरुवात करतात.

WhatsApp channel

विभाग