Aai Kuthe Kay Karte Serial Update: कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' मालिकेत सतत काहीना काही घडत असते. गेल्या काही दिवसांपासून तर मालिकेतील प्रत्येक पात्राच्या आयुष्यात चढउतार सुरु आहेत. अरुंधती आणि अनिरुद्धचे आयुष्य जर सुखकर झाले तर मग ती कसली. आता अरुंधतीच्या आयुष्यात नवे वादळ आले आहे. मायाच्या एण्ट्रीने अरुंधतीचे आयुष्य बदलले आहे. माया आशुतोषच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत आता अरुंधतीला देखील चाहूल लागली आहे. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागात काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात मनू्च्या शाळेच्या कॅम्प पासून होते. मायाचा नवरा अनुराग तिला धमकी देतो. तो मायाचे सत्य आशुतोषला सांगतो. मनू ही माया आणि अनुरागची मुलगी आहे. त्यांनी मनूचे नाव देखील दोघांच्या नावावरुन ठेवले आहे. आशुतोषला हे सर्व ऐकून धक्काच बसतो. तरही तो मायाला अनुरागपासून वाचवतो. उलट त्या अनुरागला धमकी देतो दोघींपासून लांब राहण्याची. हे सगळं झाल्यानंतर माया आशुतोषला मिठी मारते आणि गालावर किस करते. मायाचे वागणे पाहून आशुतोषला धक्का बसतो. पण तो फार काही बोलत नाही. त्यानंतर माया आशुतोषला जे काही झाले ते विसरुन जाण्यास सांगते. पण आशुतोष जे झाले ते सगळं काही अरुंधतीला सागणार असतो. आता आशुतोष खरच अरुंधतीला सांगणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: सनी लिओनीला मराठी गाण्याची भूरळ, 'नवरोबा'वर डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल
दुसरीकडे अनघाची काळजी घेण्यासाठी अरुंधती देशमुखांच्या घरात राहाताना दिसते. त्यावेळी अनुराग माया आणि आशुतोषचे व्हिडीओ करुन अरुंधतीला पाठवतो. ते पाहून अरुंधतीची डिसर्टब होते. संजना आगित तेल ओतून अरुंधतीला आणखी भडकवण्याचा प्रयत्न करते.अरुंधती आल्यामुळे घरात निर्माण झालेले आनंदाचे वातावरण पाहून अनिरुद्ध देखील खूश होतो. कांचन आजी त्याला विनंती करतात की काही झाले तरी अरुंधतीला या घरात पुन्हा घेऊन ये. हवे तर मुलांना मध्ये आण पण तिला पुन्हा या घरात आण. हे सगळे संभाषण संजना ऐकते आणि अनिरुद्धला सुनावते. तू या सगळ्यासाठी कसा तयार झालास. हे चुकीचे आहे असे ती बोलते. पण कांचन आजी मात्र, नेहमीप्रमाणे त्यांचे बरोबर असल्याचे सांगत आहेत. आता मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: चला हवा येऊ द्यामधून कुशल बद्रिकेची एग्झिट? अभिनेत्याने सांगितले सत्य
अनघाने एकदा अभीला पाहिले असते. ती सर्वांना सांगत असते की अभी हा परदेशात गेलेला नाही तू इथे असतो. पण कोणही अनघावर विश्वाल ठेवत नाही. सर्वजण तिला वेड्यात काढतात. अभी इथे असता तर घरी आला असता. जानकी आणि तुझ्याशिवाय तो राहू शकत नाही असे सर्वजण तिला समजावतात. आता अनघा जे सांगतेय ते खरे आहे की तो तिचा भास आहे हे आगामी भागात कळणार आहे.