Aai Kuthe Kay Karte 6th March: अनघासाठी अरुंधती अभीला परत घेऊन येणार? काय होणार आजच्या भागात
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte 6th March: अनघासाठी अरुंधती अभीला परत घेऊन येणार? काय होणार आजच्या भागात

Aai Kuthe Kay Karte 6th March: अनघासाठी अरुंधती अभीला परत घेऊन येणार? काय होणार आजच्या भागात

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 06, 2024 03:01 PM IST

Aai Kuthe Kay Karte 6th March Serial Update: 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा…

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

Aai Kuthe Kay Karte Serial Update: कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' मालिका गेल्या काही दिवसांपासून टीआरपीच्या यादीमध्ये घसरली असली तरी प्रेक्षकांना या मालिकेविषयी जाणून घेण्यास उत्सुकता पाहायला मिळते. अभी कॅनडाला गेल्यापासून अनघाची प्रकृती खालावली आहे. आता अनघासाठी अभीला परत आणण्यासाठी अरुंधती प्रयत्न करणार आहे.

आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही आशुतोष आणि मायाच्या कॅम्पपासून होते. अनुराग मनूच्या कॅम्पमध्ये येतो आणि गोंधळ घालतो. तो मायाला मारण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात आशुतोष तेथे येतो आणि तिला मदत करतो. आशुतोष मायाचा हात पकडतो आणि तिचे रक्षक करतो. आशुतोषचे वागणे पाहून मायाला देखील धक्का बसतो. जेव्हा अरुंधतीला याबाबत कळणार तेव्हा तिची प्रतिक्रिया काय असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
वाचा: अंबानींच्या कार्यक्रमाला कंगना गैरहजर, काय आहे कारण?

अनघाची काळजी घेण्यासाठी अरुंधती देशमुखांच्या घरात राहाताना दिसते. त्यावेळी अनुराग माया आणि आशुतोषचे व्हिडीओ करुन अरुंधतीला पाठवतो. ते पाहून अरुंधतीची डिसर्टब होते. संजना आगित तेल ओतून अरुंधतीला आणखी भडकवण्याचा प्रयत्न करते.अरुंधती आल्यामुळे घरात निर्माण झालेले आनंदाचे वातावरण पाहून अनिरुद्ध देखील खूश होतो. कांचन आजी त्याला विनंती करतात की काही झाले तरी अरुंधतीला या घरात पुन्हा घेऊन ये. हवे तर मुलांना मध्ये आण पण तिला पुन्हा या घरात आण. हे सगळे संभाषण संजना ऐकते आणि अनिरुद्धला सुनावते. तू या सगळ्यासाठी कसा तयार झालास. हे चुकीचे आहे असे ती बोलते. पण कांचन आजी मात्र, नेहमीप्रमाणे त्यांचे बरोबर असल्याचे सांगत आहेत. आता मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: 'कोणतं सरकार आणायचं हे ठरवा', नाना पाटेकरांचे शेतकऱ्यांना आवाहन

अनघाने एकदा अभीला पाहिले असते. ती सर्वांना सांगत असते की अभी हा परदेशात गेलेला नाही तू इथे असतो. पण कोणही अनघावर विश्वाल ठेवत नाही. सर्वजण तिला वेड्यात काढतात. अभी इथे असता तर घरी आला असता. जानकी आणि तुझ्याशिवाय तो राहू शकत नाही असे सर्वजण तिला समजावतात. आता अनघा जे सांगतेय ते खरे आहे की तो तिचा भास आहे हे आगामी भागात कळणार आहे.

Whats_app_banner