Aai Kuthe Kay Karte Update: 'आई कुठे काय करते' मालिकेत सतत काही तरी घडताना दिसत आहे. कधी आशुतोष अरुंधतीमध्ये काही तरी सुरु असते तर कधी यश, अभी, ईशाच्या आयुष्यात सावळा गोंधळ सुरु असतो. गेल्या काही दिवसांपासून ईशाचे वागणे हे अनिशला खटकत आहे. त्या दोघांमध्ये जराही एकमत होताना दिसत नाही. आता त्या दोघांच्या नात्यात आणखी फूट पडणार असल्याचे दिसत आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात अनिश आणि आरोही गप्पा मारत एका कॅफेमध्ये बसलेले असतात. आरोही अनिशला समजावताना दिसते. हा कठीण काळ सुरु आहे. ईशामध्ये देखील बदल होतील. तिला काही गोष्टींची जाणीव होईल. तेवढ्यात तिथे ईशा एका व्यक्तीसोबत बोलताना दिसते. तिने त्या व्यक्तीकडून पैसे उधार घेतलेले असतात. पण पैसे परत न केल्यामुळे समोरची व्यक्ती चिडलेली दिसत आहे. तेवढ्यात अनिश तेथे पोहोचतो आणि नेमके काय झाले हे जाणून घेतो. ईशाने या व्यक्तीकडूनही पैसे घेतल्याचे कळताच त्याला वाईट वाटते. तो ईशाकडे रागाच्या भरात पाहातो. आता ईशा आणि अनिशच्या नात्यात फूट पडणार की अनिश तिला योग्य शब्दात समजावणार. हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.
वाचा: आशुतोष मनू सांगणार का मायाचे सत्य? काय घडणार आजच्या भागात?
दुसरीकडे माया ही महिना भरासाठी केळकरांच्या घरी राहायला आलेली असते. ती परेदशात जाण्यापूर्वी मनूसोबत वेळ घालवायचा असतो. तसेच ती मनूला सोबत घेऊन जाण्याचा प्लान करताना दिसते. मनू देखील मायाच्या मागे फिरत असते. ते पाहून आशुतोषला त्रास होतो. पण तो काही बोलू शकत नाही. कारण शेवटी मनूची खरी आई ही माया असते. सुलेखा ताई देखील मनूला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मनू कोणाचेही ऐकत नाही. ती माया टिचरच्या मागे फिरत असते.