Aai Kuthe Kay Karte 5th March: मायाच्या आयुष्यात वादळ, 'आई कुठे काय करते' मालिकेत नव्या पात्राची एण्ट्री
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte 5th March: मायाच्या आयुष्यात वादळ, 'आई कुठे काय करते' मालिकेत नव्या पात्राची एण्ट्री

Aai Kuthe Kay Karte 5th March: मायाच्या आयुष्यात वादळ, 'आई कुठे काय करते' मालिकेत नव्या पात्राची एण्ट्री

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 05, 2024 01:38 PM IST

Aai Kuthe Kay Karte 5th March Serial Update: 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा…

Aai Kuthe Kay Karte Update:
Aai Kuthe Kay Karte Update:

Aai Kuthe Kay Karte Serial Update: कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' मालिका गेल्या काही दिवसांपासून टीआरपीच्या यादीमध्ये घसरली असली तरी प्रेक्षकांना या मालिकेविषयी जाणून घेण्यास उत्सुकता पाहायला मिळते. या मालिकेत माया आणि मनूची एण्ट्री झाल्यापासून मालिका एका वेगळ्याच वळणाव येऊन पोहोचली आहे. आज मालिकेत काय पाहायला मिळणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात.

आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही आशुतोष आणि माया हे मनूसाठी एका कॅम्पला जाताना होते. तेथे आशुतोष मनूसोबत वेळ घालवतो. तर अरुंधतीला अनघाला कॅन्सर झाल्याचे कळताच ती देशमुखांच्या घरी जाते. ती मनूच्या कॅम्पला जाण्यास नकार देते. त्यामुळे आशुतोष मनूला घेऊन मायासोबत कॅम्पला जातो. तेथे माया आणि आशुतोषमध्ये संवाद सुरु असतात. आशुतोष मनात कोणतीही भावना न आणता तिला मदत करतो. अशातच मालिकेत मायाच्या नवऱ्याची एण्ट्री होते. त्याचे नाव अनुराग असे आहे. तो माया आणि आशुतोषचे काही व्हिडीओ करुन अरुंधतीला पाठवतो. ते पाहून अरुंधतीला धक्का बसतो. आता अनुराग पुन्हा मायाच्या आयु्ष्यात येण्याचा प्रयत्न करत असतो. पण अनुरागला पाहून माया घाबरते आणि आशुतोषला मिठी मारते. ते पाहून अनुरागला देखील धक्का बसतो.
वाचा: राहाने अभिषेक बच्चनला पाहिले अन्...; प्रीवेडिंग सोहळ्यातील रणबीरच्या लेकीचा क्यूट व्हिडीओ व्हायरल

दुसरीकडे अनघाची काळजी घेण्यासाठी अरुंधती देशमुखांच्या घरात राहाताना दिसते. त्यावेळी अनुराग माया आणि आशुतोषचे व्हिडीओ करुन अरुंधतीला पाठवतो. ते पाहून अरुंधतीची डिसर्टब होते. संजना आगित तेल ओतून अरुंधतीला आणखी भडकवण्याचा प्रयत्न करते.अरुंधती आल्यामुळे घरात निर्माण झालेले आनंदाचे वातावरण पाहून अनिरुद्ध देखील खूश होतो. कांचन आजी त्याला विनंती करतात की काही झाले तरी अरुंधतीला या घरात पुन्हा घेऊन ये. हवे तर मुलांना मध्ये आण पण तिला पुन्हा या घरात आण. हे सगळे संभाषण संजना ऐकते आणि अनिरुद्धला सुनावते. तू या सगळ्यासाठी कसा तयार झालास. हे चुकीचे आहे असे ती बोलते. पण कांचन आजी मात्र, नेहमीप्रमाणे त्यांचे बरोबर असल्याचे सांगत आहेत. आता मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: लेकाच्या प्री-वेडिंगमध्ये नीता अंबानींचा राजेशाही थाट, नेकलेसची किंमत वाचून व्हाल थक्क

Whats_app_banner