मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte 5th Jan: गौरीने केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न, संजना अरुंधतीला ठरवले दोषी

Aai Kuthe Kay Karte 5th Jan: गौरीने केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न, संजना अरुंधतीला ठरवले दोषी

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 05, 2024 01:39 PM IST

Aai Kuthe Kay Karte 5th Jan Serial Update: 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा…

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

'आई कुठे काय करते' मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. आरोही आणि यशने अखेर प्रेमाची कबूली दिली असून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अरुंधतीने दोघांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. मात्र, कांचन आजीने नेहमी प्रमाणे विरोध केला. त्यानंतर मालिकेत पुन्हा गौरीची एण्ट्री झाली आहे. गौरीने यशचा निर्णय ऐकून स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला.

'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात संजनाला गौरीने आत्महत्या केल्याचे फोन आला. त्यानंतर संजना पळत तेथे पोहोचली. त्यावेळी तिला कळाले की यशच्या आरोहीसोबतच्या निर्णयामुळे तिने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. संजनाला यशचा प्रचंड राग आला. त्यानंतर तिने यशला आरोहीशी लग्न करण्यास अरुंधतीने भाग पाडल्याचे म्हटले.
वाचा: ६ वर्षांनी मोठ्या आशा भोसलेंच्या प्रेमात होते आरडी बर्मन, वाचा लव्हस्टोरी

संजना रागारागात, तावातावात अरुंधतीच्या घरी जाते. तिथे जाऊन तिला यशचा निर्णय बदलायला सांग अशी विनंती करते. मात्र, यावर अरुंधती स्पष्ट शब्दात नकार देते. यशला त्याचे निर्णय घेता येतात आणि तो ते घेतो. तो निर्णय घेण्यासाठी मी काय करायला हवे इतकेच विचारतो. शेवटी त्याच्या मनाला वाटेल तेच तो करतो असे अरुंधती म्हणते. ते ऐकून संजनाचा जळफळाट होतो. ती या सगळ्याला अरुंधती दोषी असल्याचे मानते आणि शेवटी जाताना 'जर गौरीला काही झाले तर मी तुला सोडणार नाही' या शब्दात धमकी देऊन जाते. हे सगळं आशुतोष पाहात असतो. त्याला संजना आणि अनिरुद्धचा प्रचंड राग येतो. पण तो फार काही बोलत नाही. आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

WhatsApp channel