मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte 5th Feb: आशुतोष मनू सांगणार का मायाचे सत्य? काय घडणार आजच्या भागात?

Aai Kuthe Kay Karte 5th Feb: आशुतोष मनू सांगणार का मायाचे सत्य? काय घडणार आजच्या भागात?

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 05, 2024 02:29 PM IST

Aai Kuthe Kay Karte 5th Feb Serial Update: 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा…

Aai Kuthe Kay Karte Serial update
Aai Kuthe Kay Karte Serial update

Aai Kuthe Kay Karte: छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून 'आई कुठे काय करते' पाहिली जाते. या मालिकेतील प्रत्येक पात्रने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता ही मालिका एका रंजक वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत मनूच्या वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. या आनंदाच्या क्षणी मनू टेबलावरुन खाली कोसळते. माया तिला पकडायला जाते पण तिच्या डोक्याला दुखापत होते. त्यानंतर चिडून माया सर्वांना सत्य सांगते की ती मनूची आई आहे. पण हे सत्य सर्वांनीच मनू पासून लपवले आहे. आता मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार? चला जाणून घेऊया...

'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही देशमुख कुटुंबायापासून होते. यश झोपलेला असतो. तेवढ्यात आरोही तिथे येते आणि त्याला उठवते. त्यानंतर आरोही सर्वांसाठी कांदेपोहे बनवते. अप्पा, अनिरुद्ध, अनघा, यश आवडीने पोहे खातत. संजना मात्र नेहमीप्रमाणे पोह्यांना नाव ठेवते. तसेच कांचन आजी देखील नाक मूरडताना दिसतात. पण आरोही मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करते आणि आनंदी होते.
वाचा: सेलिब्रिटी परदेशात लग्न का करतात? राहत फतेह अली खानने सांगितले कारण

दुसरीकडे मायाने सांगितलेले सत्य ऐकून आशुतोषला रात्रभर झोप आलेली नाही. तो मनूला मायाकडे कसे सोडायचे असा विचार करत बसतो. आता खरच मनू आपल्यापासून लांब जाणार का? जर मनूला आता खरे नाही सांगितले तर भविष्यात ती आपल्याला दोष देत राहणार असे अनेक प्रश्न आशुतोषच्या मनात येत आहेत. तेवढ्यात सुलेखा ताई आशुतोषला सल्ला देतात की मनूला सत्य सांगायचे. त्यानंतर ती ठरवेल. आता मालिकेत पुढे काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

WhatsApp channel

विभाग