मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte 4th March: मायामुळे अरुंधती आणि आशुतोषच्या नात्यात पडणार फूट?

Aai Kuthe Kay Karte 4th March: मायामुळे अरुंधती आणि आशुतोषच्या नात्यात पडणार फूट?

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 04, 2024 04:53 PM IST

Aai Kuthe Kay Karte 4th March Serial Update: 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा…

Aai Kuthe Kay Karte Serial update
Aai Kuthe Kay Karte Serial update

Aai Kuthe Kay Karte update: गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' ही मालिका चर्चेत आहे. या मालिकेत मनू आणि मायाची एण्ट्री झाल्यापासून मालिका रंजन वळणावर पोहोचली आहे.माया मनूला घेऊन जाण्यासाठी केळकरांच्या घरात राहात आहे. तिला मनूच्या मनात वेगळी जागा निर्माण करायची आहे. आता मायाला या सगळ्यात यश मिळणार का? असा प्रश्न पडला आहे. अशातच मनू, माया आणि आशुतोष हे शाळेच्या एका कॅप्मसाठी गेले आहेत. अरुंधतीला मात्र, अनघाच्या आजारामुळे तेथे जाता येत नाही. पण या सगळ्याचा परिणाम अरुंधती आणि आशुतोषच्या नात्यावर होणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही आशुतोष आणि माया हे मनूसाठी एका कॅम्पला जाताना होते. तेथे आशुतोष मनूसोबत वेळ घालवतो. तर अरुंधतीला अनघाला कॅन्सर झाल्याचे कळताच ती देशमुखांच्या घरी जाते. ती मनूच्या कॅम्पला जाण्यास नकार देते. त्यामुळे आशुतोष मनूला घेऊन मायासोबत कॅम्पला जातो. तेथे माया आणि आशुतोषमध्ये संवाद सुरु असतात. आशुतोष मनात कोणतीही भावना न आणता तिला मदत करतो. अशातच मालिकेत मायाच्या नवऱ्याची एण्ट्री होते. तो माया आणि आशुतोषचे काही व्हिडीओ करुन अरुंधतीला पाठवतो. ते पाहून अरुंधतीला धक्का बसतो. ती यशला सांगते की मी कॅम्पला जायला हवे होते. आई असे का बोलते हे पाहण्यासाठी यश तिचा मोबाईल घेतो आणि माया-आशुतोषचे व्हिडीओ पाहतो. तेवढ्यात संजना येते आणि आणखी आगित तेल ओतते.
वाचा: 'अच्छा तो हम चलते हैं...', धर्मेंद्र यांच्या पोस्टमुळे चाहते चिंतेत

दुसरीकडे अनघाला बरे वाटत नसल्यामुळे अरुंधती देशमुखांच्या घरी राहात असल्याचे दिसत आहे. ते पाहून अप्पा, कांचन आजी यांना आनंद होतो. अरुंधती आल्यामुळे घरात निर्माण झालेले आनंदाचे वातावरण पाहून अनिरुद्ध देखील खूश होतो. कांचन आजी त्याला विनंती करतात की काही झाले तरी अरुंधतीला या घरात पुन्हा घेऊन ये. हवे तर मुलांना मध्ये आण पण तिला पुन्हा या घरात आण. त्यासाठी लागेल ती मदत करायला आजी तयार असतात. कांचन आजी आणि अनिरुद्धमधील संभाषण संजना चोरुन ऐकते. आता संजना नेमके काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाचा: आलियाच्या कडेवरील राहाला पाहताच अनंत अंबानी झाला खूश, पाहा व्हिडीओ

WhatsApp channel

विभाग