मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte 4th Jan: व्हिडीओ कॉलवर मिठी मारायची सोय नाही; अभीमुळे आजी झाल्या भावूक

Aai Kuthe Kay Karte 4th Jan: व्हिडीओ कॉलवर मिठी मारायची सोय नाही; अभीमुळे आजी झाल्या भावूक

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 04, 2024 12:54 PM IST

Aai Kuthe Kay Karte 4th Jan Serial Update: 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा…

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

'आई कुठे काय करते' मालिकेतील प्रत्येक पात्राची वेगळी अशी कथा आहे. त्यांच्या आयुष्यात एकाच वेळी वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. मग ती अरुंधती असु दे किंवा मग संजना. मालिकेत सतत काही ना काही सुरुच असते. काही दिवसांपूर्वी अभीने कॅनडाला जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयाने सर्वजण दुखावले गेले. पण तरीही अभी त्याच्या निर्णयावर ठाम आहे. आता मालिकेत कांचन आजी थोड्या भावूक झाल्याचे पाहायला मिळते.

'आई कुठे काय करते' मालिकेत सध्या अरुंधतीच्या मुलांच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत आहेत. अभीने परदेशात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयाला अनघाने देखील विरोध केला. मात्र, अभी त्याच्या निर्णयावर ठाम आहे. त्याची परदेशात जाण्याची पूर्ण प्रक्रिया झाली असल्यामुळे तो आनंदी असतो. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून कांचन आजी देखील खूश होतात. पण त्या अभीला काही प्रश्न विचारतात ते ऐकून अभी थोडा नाराज होतो. तेव्हा तो म्हणतो 'आजी मी फार लांब चाललो नाहीये. मी फोन करेनच की.' तेव्हा कांचन आजी म्हणतात, 'व्हिडीओ कॉलवर मिठी मारायची सोय नाही.'
वाचा: 'तुझ्या बॉयफ्रेंडचं नाव काय आहे?', रिंकू राजगुरुने दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

दुसरीकडे आशुतोषला मनूची काळजी सतावत आहे. मायराच्या येण्याने आशुतोषला काही तरी चुकत आहे अशी जाणिव होते. मायरा सतत मनूच्या का मागे असते? असा प्रश्न त्याला पडला आहे. तो या सगळ्याचा शोध घेणार आहे.

'आई कुठे काय करते' आणखी एक वळण आले आहे. यशच्या हट्टा खातर आजी आरोहीसोबतच्या लग्नाला परवानगी देतात. तेवढ्यात गौरीची पुन्हा एण्ट्री झाली आहे. गौरी यशला सतत फोन करत असते. दरम्यान तिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. संजनाल याबाबत फोन येताच धक्का बसतो.

WhatsApp channel

विभाग