'आई कुठे काय करते' मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. आरोही आणि यशने अखेर प्रेमाची कबूली दिली असून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अरुंधतीने दोघांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. मात्र, कांचन आजीने नेहमी प्रमाणे विरोध केला. त्यानंतर आता यशच्या आयुष्यात पुन्हा गौरी आली आहे. तिच्या येण्याने आरोही आणि यशच्या आयुष्यात वादळ आले आहे. तरीही यशने त्याचा निर्णय बदललेला नाही. त्याने आरोहीशी साखरपुडा केला आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात यश आणि अरुंधती आरोहीसाठी अंगठी घेतात. ती घेतल्यानंतरही यशला प्रश्न पडतो की आरोही ती अंगठी स्विकारणार की नाही. यश अंगठी घेऊन केळकरांच्या घरी जातो. तो आरोहीशी बोलण्याचा प्रयत्न करतो. पण आरोही त्याला दूर करते. तरीही यश तिला मनातील सगळ्या भावना सांगतो. त्यानंतर आरोही यशला होकार देते. यश तिला अंगठी घातलो. तेवढ्यात अनिश, काचंन आजी, ईशा, अभी सगळेच तेथे पोहोचतात. अप्पा यशच्या निर्णयाने आनंदी होतात. ते त्याला पाठिंबा देतात. मात्र, कांचन आजी विरोध करतात. त्या थेट यशला सांगतात की आमचा या लग्नाला विरोध आहे. तरीही यश मागे हटत नाही.
वाचा: आईच्या आठवणीत तेजश्री प्रधान झाली भावूक, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
दुसरीकडे आशुतोषला मनूची काळजी सतावत आहे. मायराच्या येण्याने आशुतोषला काही तरी चुकत आहे अशी जाणिव होते. मायरा सतत मनूच्या का मागे असते? असा प्रश्न त्याला पडला आहे. तो या सगळ्याचा शोध घेणार आहे