मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte 31th Jan: मायाने सांगितले मनूच्या आईचे नाव, मालिका रंजक वळणावर

Aai Kuthe Kay Karte 31th Jan: मायाने सांगितले मनूच्या आईचे नाव, मालिका रंजक वळणावर

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 31, 2024 01:29 PM IST

Aai Kuthe Kay Karte 31th Jan Serial Update: 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा…

Aai Kuthe Kay Karte Serial update
Aai Kuthe Kay Karte Serial update

Aai Kuthe Kay Karte: छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून 'आई कुठे काय करते' पाहिली जाते. या मालिकेतील प्रत्येक पात्रने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता ही मालिका एका रंजक वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत मनूच्या वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. या आनंदाच्या वेळी मायाने मनूची आई कोण आहे? याबाबत माहिती दिली आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात मनूच्या वाढदिवसाची लगबग पाहायला मिळते. सर्वजण केळकरांच्या घरी पार्टीला जाणार असतात. मनूच्या वाढदिवसासाठी माया डेकेअरमध्ये जोरदार तयारी करते. पण अरुंधती आणि आशुतोष तिला घेऊन बाहेर जातात. माया फोन करते तेव्हा अरुंधती तिला संध्याकाळी वाढदिवसाला येण्याचा आमंत्रण देते. यशच्या लग्नाची पूजा मनूच्या वाढदिवसामुळे पुढे ढकलण्यात येते.
वाचा: 'माझ्या भावानं जर माझं ऐकलं असतं तर....', अरबाजच्या लग्नावर सलमानची प्रतिक्रिया

आता मनूच्या वाढदिवसाला तिच्या शाळेतले सगळे आलेले असतात. माया तिला मस्करीमध्ये वाढदिवसाला येणार नसल्याचे सांगते. ते ऐकून मनूला राग येतो आणि ती लपून बसते. अरुंधती, आशुतोष, सुलेखा ताई, यश, आरोही, वाढदिवसाला आलेले सगळे पाहुणे मनूला शोधतात. पण मनू मात्र बाहेर येत नाही. शेवटी माया वाढदिवसाला येते आणि ती मनूला बाहेर बोलावते. मनू सगळ्यांसोबत आनंदाने केक कापते. त्यानंतर घरी गेल्यावर मनूला पुन्हा कोणत्या तरी गोष्टीचा राग येतो. ते पाहून माया आशुतोष आणि अरुंधतीला सुनावते. 'तुम्हाला झेपत नाही तर कशाला मनूला दत्तक घेताय' असे म्हणते. त्यावर अरुंधतीला तिला योग्य शब्दात सुनावते. या सगळ्यानंतर माया मनूची खरी आई कोण आहे हे सांगते. 'मी मनूला आठ महिने माझ्या पोटात मोठं केलय. मी तिची आई आहे' असे माया म्हणते. ते ऐकून आशुतोष आणि अरुंधतीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

गेल्या काही दिवसांपासून आशुतोषला मायावर संशय असतो. नितिन देखील भीती व्यक्त करत असतो. नितिन मायाची माहिती काढण्याचा प्रचंड प्रयत्न करतो. पण त्याला ती कुठेही सापडत नाही. मायाचे बोलणे ऐकून आशुतोष आणि नितिनचा संशय खरा ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. तसेच आशुतोष मनूला मायाकडे सोपावणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

WhatsApp channel