'आई कुठे काय करते' मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. आरोही आणि यशने अखेर प्रेमाची कबूली दिली असून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अरुंधतीने दोघांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. मात्र, कांचन आजीने नेहमी प्रमाणे विरोध केला. त्यानंतर आता यशच्या आयुष्यात पुन्हा गौरी आली आहे. तिच्या येण्याने आरोही आणि यशच्या आयुष्यात वादळ आले आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात यश घर सोडून रागाच्या भरात जाताना दिसत आहे. कारण यशला सतत गौरीचे फोन येत असतात. ते पाहून आरोहीला असे वाटते की यश पुन्हा तिच्याकडे जाणार आहे. तो सध्या त्याच्यावर ओढावलेल्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तिचा आधार घेत आहे अशी भावना आरोहीच्या मनात येते. यश रागच्या भरात अरुंधतीकडे जातो. तिला काय योग्य आहे आणि काय नाही हे विचारतो. तेव्हा अरुंधती त्याला आरोहीच तुझ्यासाठी योग्य आहे असे समजवते.
वाचा: रायगडमध्ये जन्म झालेल्या नाना पाटेकरांचे खरे नाव माहिती आहे का?
यश दुसऱ्या दिवशी आरोहीला मनवण्यासाठी तिच्या घरी जातो आणि तिही प्रेमाची कबूली देते. त्यानंतर यश अंगठी घालून तिच्यासोबत साखरपुडा करतो. तेवढ्यात कांचन आजी आणि ईशा तेथे येतात.