छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून 'आई कुठे काय करते' पाहिली जाते. या मालिकेतील प्रत्येक पात्रने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता ही मालिका एका रंजक वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत मनूच्या वाढदिवसाची जोरदार तयारी सुरु असते. आता कांचन आजीने यशची लग्नापूर्वीची पूजा देखील याच दिवशी ठेवली आहे. त्यामुळे आता अरुंधती वाढदिवस साजरा करणार की यशच्या पूजेला जाणार हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार.
'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात यश, आरोही, आशुतोष आणि ईशा हे मनूच्या वाढदिवसाची तयारी करताना दिसतात. मनूला कसे सरप्राइज द्यायचे? कोणाकोणाला बोलवायचे? या सगळ्याचे नियोजन करत असताना माया टीचरला बोलवायचे की नाही? असे प्रश्न पडले आहेत. त्यात माया तिला सोन्याची चैन गिफ्ट दिली. ते पाहून आशुतोषला प्रश्न पडतो की माया असे का वागते? तो मायाची संपूर्ण माहिती काढण्यास सांगतो. आता मायाचे सत्य समोर येणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: 'या' आठवड्यात हे चित्रपट आणि वेबसीरिज होणार रिलीज
दुसरीकडे यश आणि आरोहीच्या लग्नपत्रिकेत दोष आहे. त्यामुळे त्यांना लग्नापूर्वी एक पूजा करायला सांगितली आहे. ज्या दिवशी मनूचा वाढदिवस आहे त्याच दिवशी ही पूजा ठेवण्यात येते. यश, संजना, अनिरुद्ध, अनघाला कांचन आजी या पूजेमुळे घरात थांबण्याची शक्ती करतात. आता सगळे या पूजेसाठी जाणार की वाढदिवसाला हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
देशमुखांच्या घरात संजना शांत होण्याचे नाव घेतच नाही. ती अनिरुद्ध आणि यशला घालून पाडून सतत बोलताना दिसते. यावेळी यशने देखील तिला चांगले सुनावले आहे. गौरी लग्नाला येणार असल्याचे यशने स्पष्ट केले आहे. आता गौरी खरच येणार की यश संजनाला सांगण्यासाठी करतो हे मालिकेच्या आगामी भागात स्पष्ट होणार आहे.
संबंधित बातम्या