मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte 27th Jan: वाढदिवशी मायाने मनूला दिले खास गिफ्ट, काय असेल आशुतोषची प्रतिक्रिया

Aai Kuthe Kay Karte 27th Jan: वाढदिवशी मायाने मनूला दिले खास गिफ्ट, काय असेल आशुतोषची प्रतिक्रिया

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 27, 2024 01:22 PM IST

Aai Kuthe Kay Karte 27th Jan Serial Update: 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा…

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

'आई कुठे काय करते' मालिकेत गेल्या काही दिवसांपासून आशुतोष हा मनूच्या बाबतीत खूपच सिरियस झाला आहे. तो सतत मनूची काळजी करताना दिसतो. अरुंधती त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. मात्र, आशुतोष काही ऐकण्यास तयार नसतो. मनूची माया टीचर सतत तिच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करत असते. आता मनूच्या वाढदिवशी मायाने दिलेले गिफ्ट पाहून काय असेल आशुतोषची प्रतिक्रिया?

'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात यश, आरोही, आशुतोष आणि ईशा हे मनूच्या वाढदिवसाची तयारी करताना दिसतात. मनूला कसे सरप्राइज द्यायचे? कोणाकोणाला बोलवायचे? या सगळ्याचे नियोजन करत असताना माया टीचरला बोलवायचे की नाही? असा प्रश्न देखील त्यांना पडला आहे. जर बोलवले तर आशुतोषला राग येणार आणि नाही बोलावले तर मनू चिडेल. त्यामुळे आता नेमके काय करायचे? असा प्रश्न त्यांना पडला आहे.
वाचा: आसमानी मोहब्बत! कसा आहे दीपिका आणि हृतिकचा 'फायटर?', वाचा रिव्ह्यू

घरातून चिडून गेलेल्या मनूला अरुंधती कसेबसे घरी घेऊन येते. ती येऊन आशुतोषची माफी मागते. आशुतोषही मनूची माफी मागतो. पण त्यानंतर मनू तिच्या गळ्यातील नवी चेन आशुतोषला दाखवते. ती चैन तिला मायाने वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून दिलेली असते. आता आशुतोष ती मायाला परत देणार की मनूच्या गळ्यात राहू देणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

देशमुखांच्या घरात संजना शांत होण्याचे नाव घेतच नाही. ती अनिरुद्ध आणि यशला घालून पाडून सतत बोलताना दिसते. यावेळी यशने देखील तिला चांगले सुनावले आहे. गौरी लग्नाला येणार असल्याचे यशने स्पष्ट केले आहे. आता गौरी खरच येणार की यश संजनाला सांगण्यासाठी करतो हे मालिकेच्या आगामी भागात स्पष्ट होणार आहे.

WhatsApp channel