'आई कुठे काय करते' मालिकेत गेल्या काही दिवसांपासून आशुतोष हा मनूच्या बाबतीत खूपच सिरियस झाला आहे. तो सतत मनूची काळजी करताना दिसतो. अरुंधती त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. मात्र, आशुतोष काही ऐकण्यास तयार नसतो. मनूची माया टीचर सतत तिच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे आशुतोषने आता टोकाचा निर्णय घेतला आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात सुलेखा ताई आल्यापासून त्या आशुतोषला नेमके काय झाले आहे? हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आशुतोष मनूला डेकेअरमध्ये जाण्यास परवानगी तर देतो. पण माया टीचरच्या डेकेअरमध्ये तो जाण्यास नकार देतो. हे ऐकून मनू नाराज होते. ती रागाच्या भरात खोलीमध्ये जाते आणि आतून लॉक लावून घेते. अरुंधती आणि सुलेखा ताई तिला बाहेर आणण्याचा प्रयत्न करतात. पण मनू काही ऐकायला तयार नसते.
वाचा: "मेरी कहानी का हर पन्ना खून से लिखा था", अंगावर शहारे आणणारा आर्या ३चा ट्रेलर रिलिज
अरुंधतीला रडू कोसळते. ती मनूला समजवण्याचा प्रयत्न करते. पण आधी मनूच्या रडण्याचा आवाज येतो आणि नंतर तोही येणे बंद होते. त्यामुळे अरुंधती आणखी घाबरते. ती मायाला तेथे बोलावून घेते. किमान तिचा आवाज ऐकून तरी मनू रुमचा दरवाजा उघडेल असे सुलेखा ताई आणि अरुंधतीला वाटते. पण मायाचे घरात येणे आशुतोषला आवडेल का? मायाला पाहून आशुतोष काय प्रतिक्रिया देणार? तो पुन्हा अरुंधतीवर रागावणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत.
संबंधित बातम्या