मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte 23rd Jan: अभी कायमचा परदेशात शिफ्ट झाला, अनघाला बसला मोठा धक्का

Aai Kuthe Kay Karte 23rd Jan: अभी कायमचा परदेशात शिफ्ट झाला, अनघाला बसला मोठा धक्का

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 23, 2024 01:20 PM IST

Aai Kuthe Kay Karte 23nd Jan Serial Update: 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा…

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

'आई कुठे काय करते' मालिकेत सतत काही ना काही घडतच असते. मग ती अरुंधती असो वा अनिरुद्ध. मालिकेतील प्रत्येक पात्राच्या आयुष्यात गोष्टी घडत असतात. नुकताच मालिकेत यश आणि आरोहीचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर लगेच अभी परदेशात जाण्यास निघाला आहे. त्याला सर्वांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो काही थांबला नाही. आत मालिकेत नवे वळण आले आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात अभी परदेशात जायला निघाला आहे. तो बॅग घेऊन सर्वांसमोर येतो. सगळ्यांची एकएक आठवण सोबत घेतो. सगळ्यात शेवटी तो अनघाला भेटतो आणि एक पत्र देतो. या पत्रात तो पुन्हा घरी येणार नसल्याचे सांगतो ते वाचून अरुंधतीला धक्का बसतो. तिला कळत नाही नेमकं काय सुरु आहे. तिच्या तिन्ही मुलांच्या आयुष्यात सतत संकट येताना दिसतात.
वाचा: 'बिग बॉस १७'मध्ये नवा ट्विस्ट, अंकिता लोखंडे रेसमधून बाहेर?

दुसरीकडे यश आणि आरोहीच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. त्या दोघांमध्ये जवळीक वाढली असून रोमँटिक होताना दिसत आहेत. ते पाहून संजनाचा जळफळाट होताना दिसत आहे. गौरीसोबत असे करुन यश कसा आरोहीसोबत रोमँटिक होत आहे हे ती रागाच्या भरात अनिरुद्धला सांगते. तेव्हा अनिरुद्ध चिडतो आणि तिला बोलतो २६ वर्षे अरुंधतीसोबत संसार केल्यानंतर तिच्या रुममध्ये, जागेवर आज तू आहेस. मला काहीच वाटत नाहीये. ते ऐकून संजनाचा पारा आणखीच चढतो. आता संजना पुढे काय नवा डाव खेळणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

WhatsApp channel

विभाग