'आई कुठे काय करते' मालिकेत सध्या यश आणि आरोहीच्या साखरपुड्याची तयारी सुरु होती. आता देशमुख आणि केळकरांच्या अनुमतीने त्यांचा साखरपुडा पार पडला आहे. त्यांच्या साखरपुडा सोहळ्यात सर्वजण आनंदी असल्याचे पाहायला मिळाले. आता मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. अभी हा कॅनडाला जायला निघाल्यामुळे सर्वजण भावूक झाले आहेत.
'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही अभी पासून होते. अभी हा कॅनडाला जायला निघाला आहे. त्याची बॅग यशने सर्वांसमोर आणून ठेवली आहे. तो घरातील प्रत्येक व्यक्तीची एक आठवण सोबत घेतो. जेणे करुन जेव्हा त्यांची आठवण येईल तेव्हा त्यांच्या काही वस्तू उघडून बघता येतील. अभी सर्वांना भेटतो आणि कॅनडाला जायला निघतो. सर्वजण भावूक होतात. अनघाला देखील अश्रू अनावर होतात.
वाचा: किती हा ढोंगीपणा! कंगना रनौतचा मंदिरातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; नेटकरी करतायत ट्रोल
दुसरीकडे यश आणि आरोहीच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. त्या दोघांमध्ये जवळीक वाढली असून रोमँटिक होताना दिसत आहेत. ते पाहून संजनाचा जळफळाट होताना दिसत आहे. गौरीसोबत असे करुन यश कसा आरोहीसोबत रोमँटिक होत आहे हे ती रागाच्या भरात अनिरुद्धला सांगते. तेव्हा अनिरुद्ध चिडतो आणि तिला बोलतो इतकी वर्षे अरुंधतीसोबत संसार केल्यानंतर तिच्या जागेवर आज तू आहेस. मला काहीच वाटत नाहीये. ते ऐकून संजनाचा पार आणखीच चढतो.
संबंधित बातम्या