मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  आशुतोषच्या निधनानंतर अरुंधतीला घरी नेण्यास संजनाचा नकार, काय असेल आप्पांची प्रतिक्रिया

आशुतोषच्या निधनानंतर अरुंधतीला घरी नेण्यास संजनाचा नकार, काय असेल आप्पांची प्रतिक्रिया

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 21, 2024 03:56 PM IST

'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधतीवर दु:खाचा डोंगर कोसळल्याचे दिसत आहे. त्यामुळे आजच्या भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

आशुतोषच्या निधनानंतर अरुंधतीला घरी नेण्यास संजनाचा नकार, काय असेल आप्पांची प्रतिक्रिया
आशुतोषच्या निधनानंतर अरुंधतीला घरी नेण्यास संजनाचा नकार, काय असेल आप्पांची प्रतिक्रिया

'आई कुठे काय करते' मालिकेत आशुतोषच्या निधनानंतर अरुंधतीवर मोठे संकट कोसळले आहे. तिचे आयुष्य संपूर्ण बदलून गेले आहे. सुलेखा ताईंनी थेट अरुंधतीला स्विकारण्यास नकार दिला आहे. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यामुळे आता अरुंधती कुठे जाणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आजच्या भागात प्रेक्षकांना त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर देखील मिळणार आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेत आजच्या भागात अरुंधती सदम्यात असल्याचे दिसत आहे. आशुतोषच्या निधनाची घटना ती पूर्णपणे विसरली आहे. यश तिला घडलेल्या घटणेची जाणीव करुन देतो. त्यानंतर तिला धक्का बसतो. या सगळ्यात सुलेखा ताई अरुंधतीला आशुतोषच्या निधनाला दोषी मानतात. त्या सर्वांसमोर बोलतात की, अरुंधती जेव्हा माझ्या मुलाशी लग्न करुन आली तेव्हा तिचा माझ्याशी संबंध आला. आता माझा मुलगा या जगात नाही त्यामुळे माझा अरुंधतीशी काहीच संबंध नाही. त्यांनी थेट अरुंधतीला घरी ठेवून घेण्यास नकार दिला आहे.
वाचा: अरुंधतीची प्रकृती गंभीर, कुटुंबीयांनी चाहत्यांकडे केली मदतीची मागणी

कांचन आजाली आशुतोषच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला आहे. आता अरुंधतीचे पुढे काय होणार? असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यांनी सुलेखा ताईंनी एकदा अरुंधतीकडे पाहा आणि तिच्याकडे पाहून उर्वरीत आयुष्य जगा असे म्हटले. त्यावर सुलेखा ताईंनी थेट नकार दिला. त्यानंतर अनिरुद्ध अरुंधतीकडे जातो आणि मी तुझ्या कामयच सोबत आहे हे लक्षात ठेव. जगाने तुझ्याकडे पाठ फिरवली तरी मी फिरवणार असे तो म्हणतो. त्यानंतर कांचन आजी देखील अरुंधतीला घरी घेऊ जाण्याची इच्छा व्यक्त करतात. पण या सगळ्यात संजनाला मात्र असुरक्षित वाटते. अरुंधती पुन्हा या घरात आली तर ती हे घर आणि अनिरुद्धला माझ्याकडून हिरावून घेईल अशी भावना तिच्या मनात येते. ती सर्वांसमोर 'हे माझं घर आहे आणि अनिरुद्ध सुद्धा माझा आहे. अरुंधतीचे ते घर. ती तिथेच राहणार' असे बोलते. आता अरुंधतीसोबत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

मालिका नव्या वेळेत

'आई कुठे काय करते' मालिका आता स्टार प्रवाह वाहिनीवर वेगळ्या वेळेत सुरु आहे. पहिले ही मालिका संध्याकाळी ७ वाजता लागायची. आता ही मालिका दुपारी २च्या दरम्यान प्रदर्शित होते. या मालिकेच्या वेळेत ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवी मालिका प्रसारित होत आहे.

IPL_Entry_Point