'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात अरुंधती सदम्यात असल्याचे दिसत आहे. तिचा विश्वासच बसत नाही की आशुतोषचे निधन झाले आहे. यश तिला घरी घेऊन येतो आणि झोपवतो. थोड्या वेळ्याने अरुंधती उठते आणि आशुतोषच्या वाढदिवसाची तयारी करायला सुरुवात करते. तिला आशुतोषचे निधन झाल्याची घटना ही केवळ स्वप्नवत वाटते. त्यामुळे उठून ती पुन्हा आशुतोषच्या वाढदिवसाची तयारी करायला घेते. अनिश आणि यश तिला समजावण्याचा प्रयत्न करतात. पण अरुंधतीला त्यांचे म्हणणे मान्य नाही. ती आशुतोषची वाट पाहात बसते.
दुसरीकडे सुलेखा ताईंना देखील आशुतोषच्या निधनाचा धक्का बसतो. त्या अरुंधतीला आशुतोषच्या निधनाला दोषी मानतात. अरुंधतीमुळेच आज आशुतोष आपल्याला सोडून गेला असे त्या सतत बोलताना दिसत आहेत. तसेच त्यांनी अरुंधतीसोबत असलेले सगळे संबंध तोडले आहेत. आशुतोषच्या निधनानंतर माझा आणि अरुंधतीचा संबंध संपला असे त्या बोलतात. ते ऐकून सर्वजण चकीत होतात.
वाचा: त्या चित्रपटाच्या वेळी माझं ब्रेकअप झालं; प्राजक्ता माळीचे खासगी आयुष्यावर वक्तव्य
देशमुखांना याबाबत कळताच सर्वांना धक्का बसतो. ते पळत केळकरांच्या घरी येतात. सुलेखा ताईंनी घेतलेला निर्णय ऐकून आप्पा, अनिरुद्ध, कांचन आजी, संजना, अभी, अनघा सर्वांनाच धक्का बसतो. तेवढ्यात कांचन आजी अरुंधतीला घरी घेऊन जाणार असल्याचा निर्णय सांगतात. अनिरुद्ध अरुंधतीला धीर देण्याचा प्रयत्न करत असतो. आता अरुंधती या सगळ्याला तयार होणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
वाचा: असले फालतू उपदेशाचे डोस...; 'घरोघरी मातीच्या चुली'वर प्रेक्षकांचा संताप
अरुंधतीसोबत घडलेल्या घटनेनंतर संजना मात्र, चलबिचल झाली आहे. आता अरुंधती पुन्हा देशमुखांच्या घरी राहायला येणार, ती पुन्हा सगळ्यांचा मनात घर करणार, अप्पा सगळी संपत्ती पुन्हा अरुंधतीच्या नावावर करतील असे अनेक प्रश्न तिला पडत आहेत. संजना या सगळ्यावर तोडगा कारण्यासाठी वकिलांना फोन करते. पण तेही तिला सांगतात की अप्पांच्या नावावर घर आहे. त्यामुळे ते घर कोणाला द्यायचे हा पूर्णपणे त्यांचा निर्णय असणार आहे. तसेच अनिरुद्ध पुन्हा आता अरुंधतीकडे जाणार याची भीती संजनाच्या मनात आहे. अनिरुद्ध अरुंधतीला समजावत असतो तेव्हा संजना त्याच्याकडे रागाने पाहात असते. आता अनिरुद्ध देखील आपल्या हातातून गेल्याची भावना संजनाच्या मनात येऊ लागली आहे. त्यामुळे संजना आगामी भागात काय कटकारस्थान रचणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या