Aai Kuthe Kay Karte 20th Feb: माया आणि मनूमुळे आशुतोष-अरुंधतीमध्ये फूट, मालिका वेगळ्या वळणावर
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte 20th Feb: माया आणि मनूमुळे आशुतोष-अरुंधतीमध्ये फूट, मालिका वेगळ्या वळणावर

Aai Kuthe Kay Karte 20th Feb: माया आणि मनूमुळे आशुतोष-अरुंधतीमध्ये फूट, मालिका वेगळ्या वळणावर

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 20, 2024 12:35 PM IST

Aai Kuthe Kay Karte 20th Feb Serial Update: 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा…

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

Aai Kuthe Kay Karte update: गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' ही मालिका चर्चेत आहे. या मालिकेत मनू आणि मायाची एण्ट्री झाल्यापासून मालिका रंजन वळणावर पोहोचली आहे.माया मनूला घेऊन जाण्यासाठी केळकरांच्या घरात राहात आहे. तिला मनूच्या मनात वेगळी जागा निर्माण करायची आहे. आता मायाला या सगळ्यात यश मिळणार का? असा प्रश्न पडला आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात आशुतोष हा देशमुखांच्या घरातून रागाने निघून आला आहे. तो घरी येऊन मनूसोबत वेळ घालवताना दिसतो. तेथे माया देखील असते. माया, आशुतोष आणि मनू एकत्र बसून खेळत असतात. दरम्यान, मायाच्या डोळ्याला लागते. तर आशुतोष फुंकर मारत असतो. तेवढ्यात अरुंधती आणि अनिश तेथे पोहोचतो. ते पाहून अरुंधतीला धक्का बसतो. त्यानंतर आशुतोष अरुंधतीला म्हणतो की तू आजही देशमुख कुटुंबीयांमध्ये अडकली आहे. तुला ते जास्त जवळचे वाटतात. त्यावर अरुंधती आशुतोषला समजावण्याचा प्रयत्न करते. पण तो काही ऐकायला तयार नाही. आता मायाच्या वागण्यामुळे आणि मनूच्या येण्यामुळे अरुंधती व आशुतोषच्या नात्यात फूट पडते का हे पाहावे लागणार आहे.
वाचा: शुटिंग दरम्यान तेजश्री प्रधान डायलॉग विसरली अन्...; पुढे काय झाले पाहा मजेशीर व्हिडीओ

दुसरीकडे यश आणि आरोहीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. ते दोघेही सतत रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. पण या सगळ्यात ईशामुळे घरात येणारा तिचा नवा मित्र आणि गुंड सतत आरोहीला बोलताना दिसत आहे. आता यशला समजावणार की त्याच्याशी भांडण करणार हे आगामी भागात कळणार आहे.

Whats_app_banner