मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte 1st Feb: माया मनूला घेऊन अमेरिकेला जाणार? काय होणार आजच्या भागात

Aai Kuthe Kay Karte 1st Feb: माया मनूला घेऊन अमेरिकेला जाणार? काय होणार आजच्या भागात

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 01, 2024 01:49 PM IST

Aai Kuthe Kay Karte 1st Feb Serial Update: 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा…

Aai Kuthe Kay Karte Serial update
Aai Kuthe Kay Karte Serial update

Aai Kuthe Kay Karte: छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून 'आई कुठे काय करते' पाहिली जाते. या मालिकेतील प्रत्येक पात्रने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता ही मालिका एका रंजक वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत मनूच्या वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. या आनंदाच्या क्षणी मनू टेबलावरुन खाली कोसळते. माया तिला पकडायला जाते पण तिच्या डोक्याला दुखापत होते. आता आजच्या भागात काय होते जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात मनू पडल्यामुळे सर्वांना टेन्शन आले आहे. मनू कधी शुद्धीवर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे सगळं सुरु असताना माया प्रचंड चिडते. ती आशुतोष आणि अरुंधीताल तुम्हाला मनूची काळजी घेण्यास जमत नाही तर घरी आणले कशाला. तुमच्या आईचे आश्रम आहे तर आवडलेल्या मुलाला अगदी सहज तुम्ही घरी उचलून आणता आहेत. मनूला तिसऱ्यांदा मी वाचवले आहे असे म्हणते.
वाचा: काय आहे प्रिती झिंटाचे खरे नाव? जाणून घ्या

मायाचे बोलणे ऐकून अरुंधती आणि आशुतोष चिडतात. मायाला ती कोणीही नसताना फुकटचा सल्ला देत असल्याची जाणीव करुन देतात. त्यावर माया चिडून मी मनूची खरी आई आहे. तिला माझ्या पोटात मी ९ महिने वाढवले आहे. पुढच्या एक महिन्यात मी अमेरिकेला निघून जाणार आहे. तेव्हा मनूला देखील घेऊन जाणार असे बोलते. आता माया खरच मनूला घेऊन जाणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून आशुतोषला मायावर संशय असतो. नितिन देखील भीती व्यक्त करत असतो. नितिन मायाची माहिती काढण्याचा प्रचंड प्रयत्न करतो. पण त्याला ती कुठेही सापडत नाही. मायाचे बोलणे ऐकून आशुतोष आणि नितिनचा संशय खरा ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. तसेच आशुतोष मनूला मायाकडे सोपावणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग