Aai Kuthe Kay Karte Serial Update: 'आई कुठे काय करते' मालिकेत आशुतोषचे निधन होणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच कळाले होते. आता अखेर त्याचे अपघाती निधन झाले आहे. त्याच्या निधनाने अरुंधतीला मोठा धक्का बसला आहे. आता मालिकेत पुढे काय होणार? हे जाणून घेण्यासाठी बातमी वाचा...
'आई कुठे काय करते' मालिकेत माया मनूला घेऊन परदेशात निघून जाते. तिच्या जाण्याने आशुतोषला मोठा धक्का बसतो. आशुतोष तिला परत घरी घेऊन येण्याचा हट्ट करतो आणि त्यासाठी विमानतळावर जातो. रस्त्यात आशुतोषला मनू दिसते. तो अरुंधतीला गाडी थांबवण्यासाठी सांगतो. हा सगळा आशुतोषला होणारा भास असल्यामुळे अरुंधती काही गाडी थांबवत नाही. तो चालत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करतो आणि गाडीतून खाली पडतो. त्याचे डोके एका दगडावर आपटले जाते. त्यामुळे आशुतोषचे निधन होते. या सगळ्याचा अरुंधतीला मोठा धक्का बसतो.
वाचा: किली पॉलला ‘गुलाबी साडी’ गाण्याची भुरळ, गाणे गातानाचा मजेशीर व्हिडीओ केला शेअर
आशुतोषच्या निधनाला सुलेखा ताई अरुंधतीला दोषी मानतात. त्या अरुंधतीसोबत आता माजा काही संबंध नाही असे म्हणतात. आता अरुंधती कुठे जाणार? कशी राहणार? असे प्रश्न सर्वांना पडला आहे. या सगळ्यात अनिरुद्ध आणि कांचन आजी पुढे सरसावतात. ते अरुंधतीची पुन्हा जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतात. मात्र, त्यांच्या या निर्णयाने संजनाच्या मनात भीती निर्माण होते. आता अनिरुद्ध आणि हे घर तिच्या हातून निघून जाणार असल्याची भीती तिला वाटते. शेवटी ती एका वकीलाचा सल्ला घेते. त्यावेळी तो वकील देखील हेच सांगतो जर घर अप्पांच्या नावावर आहे तर ते कोणाच्याही करु शकतात. आता मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या