मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte 19th Jan: लग्नासाठी आरोहीने ठेवली देशमुखांपुढे अट, कांचन आजी करणार का मान्य?

Aai Kuthe Kay Karte 19th Jan: लग्नासाठी आरोहीने ठेवली देशमुखांपुढे अट, कांचन आजी करणार का मान्य?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 19, 2024 11:36 AM IST

Aai Kuthe Kay Karte 19th Jan Serial Update: 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा…

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

'आई कुठे काय करते' मालिकेत सध्या यश आणि आरोहीच्या साखरपुड्याची तयारी सुरु होती. आता देशमुख आणि केळकरांच्या अनुमतीने त्यांचा साखरपुडा पार पडला आहे. त्यांच्या साखरपुडा सोहळ्यात सर्वजण आनंदी असल्याचे पाहायला मिळाले. आता मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेत आजच्या भागात साखरपुड्याचा आनंद द्वीगुणी करण्यासाठी यश, आरोही, अनिश आणि ईशा डान्स करतात. त्यांचा डान्स पाहून सर्वजण आनंदी होतात. त्यानंतर कांचन आजी गाणे गाण्यासाठी समोर येतात. तेवढ्यात गेल्या काही दिवसांपासून कामानिमित्त बाहेर गेलेल्या सुलेखा ताई येतात आणि त्यांच्यासोबत गाणे गाऊ लागतात. अरुंधती देखील त्यांना साथ देते. त्यांचे गाणे सर्वांना आवडते.
वाचा: कौतुकास्पद! जॅकी श्रॉफने पुसल्या राम मंदिराच्या पायऱ्या Video Viral

त्यानंतर आरोही आणि यश यांचा विवाहसोहळा एक महिन्यात झाला पाहिजे असे कांचन आजी म्हणतात. कारण गुरुजींनी त्यांच्या संसारात अनेक अडचणी येणार असल्याचे सांगितले असते. त्यामुळे आशुतोषशी बोलून कांचन आजी लग्नाची तारीख काढण्याचे ठरवतात. अरुंधती यश आणि आरोहीची परवानगी घेते. तेवढ्यात आरोही ही सर्वांसमोर एक मांडते. 'माझे कोणी कुटुंबीय नाहीत, माझे घर पण नाही. माझे जे काही ते आश्रमाशी जोडलेले आहे. त्यामुळे माझी इच्छा आहे की आमचे लग्न आश्रमात व्हावे' असे म्हणते. आशुतोषला ते ऐकून आनंद होतो. पण कांचन आजी यासाठी तयार होणार का? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.

WhatsApp channel

विभाग