Aai Kuthe Kay Karte: आशुतोषचा अपघात कसा झाला? समोर आले कारण
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte: आशुतोषचा अपघात कसा झाला? समोर आले कारण

Aai Kuthe Kay Karte: आशुतोषचा अपघात कसा झाला? समोर आले कारण

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 18, 2024 02:22 PM IST

Aai Kuthe Kay Karte 18th March Serial Update: 'आई कुठे काय करते' मालिकेचा आजचा भाग रंजक ठरणार आहे. मालिकेत नेमकं काय पाहायला मिळणार यासाठी ही बातमी नक्की वाचा...

आशुतोषचा अपघात कसा झाला? समोर आले कारण
आशुतोषचा अपघात कसा झाला? समोर आले कारण

Aai Kuthe Kay Karte Serial Update: काही दिवसांपूर्वी 'आई कुठे काय करते' मालिकेत आशुतोषचा अपघाती मृत्यू होणार असल्याची माहिती प्रोमोच्या माध्यमातून देण्यात आली होती. आज १८ मार्च रोजी 'आई कुठे काय करते' मालिकेत आशुतोषचे निधन दाखवण्यात येणार आहे. नेमका आशुतोषचा मृत्यू का होतो या मागिल देखील कारण समोर आले आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही आशुतोषच्या वाढदिवसापासून होते. देशमुख कुटुंबीय आशुतोषच्या वाढदिवसासाठी केळकरांच्या घरी आले आहेत. सर्वजण आनंदाने आशुतोषला सरप्राइज देता यावे यासाठी एकत्र आले आहेत. माया आणि मनू देखील आशुतोषसाठी केक बनवतात. आशुतोष जेव्हा येतो तेव्हा त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला घरात घेऊन येतात. सगळ्यांनी त्याला दिलेले सरप्राइज प्रचंड आवडते. त्यानंतर सगळेजण आशुतोषला केक कापण्याचा आग्रह करतात. तो मनूला बोलवून तिच्यासोबत केक कापतो.
वाचा: अभिनेत्री तेजश्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, शेअर केले फोटो

दरम्यान, मनू आशुतोषला बाबा ऐवजी आशुतोष काका आणि अरुंधती काकू असा आवाज देते. ते ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. मनू अशी का वागते असा प्रश्न आशुतोषला पडतो. त्यानंतर सगळेजण एकत्र बसून आशुतोषचा वाढदिवस साजरा करतात. या सगळ्याचा फायदा घेत माया मनूला अमेरिकेला घेऊन जायला निघते. ती कोणालाही न सांगता तेथून जाते. आशुतोषला जेव्हा कळते तेव्हा त्याला धक्काच बसतो. तेवढ्यात मनूचा व्हिडीओ कॉल येतो. ती माया मम्मासोबत परदेशात निघून चालली असल्याचे सांगते. आशुतोषला हे मान्य नसते. तो मनूला परत घरी घेऊन येण्यासाठी विमानतळावर जाताना दिसतो.
वाचा: कार्तिक आर्यनने खरेदी केली नवी कार, किंमत ऐकून बसेल धक्का

आशुतोषला मानसिकदृष्ट्या खूप त्रास होतो. मनूला गमावणे त्याला सहनच होत नाही. अरुंधती गाडी चालवत असताना त्याला अचानक मनू रस्त्यावर दिसते. तो अरुंधतीकडे गाडी थांबवण्याचा हट्ट करतो. पण तेथे कोणीच नसल्यामुळे अरुंधती गाडी थांबवत नाही. आशुतोष चालत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करतो आणि एका दगडावरुन जाऊन त्याचे डोके आपटते. अरुंधतीच्या गाडीचा देखील अपघात होतो. या अपघातामध्ये आशुतोषचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले आहे.  आता मालिकेच्या आगामी भागात अरुंधतीची काय अवस्था असणार आहे याविषयी दाखवण्यात येणार आहे. तसेच मालिका आता नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Whats_app_banner