'आई कुठे काय करते' मालिकेत गेल्या काही दिवसांपासून आशुतोष हा मनूच्या बाबतीत खूपच सिरियस झाला आहे. तो सतत मनूची काळजी करताना दिसतो. अरुंधती त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. मात्र, आशुतोष काही ऐकण्यास तयार नसतो. मनूची माया टीचर सतत तिच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करत असते. आता माया आणि मनूला पाहून संजनाने अरुंधतीला सल्ला दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला यश आणि आरोहीचा साखरपुडा आज 'आई कुठे काय करते' मालिकेत संपन्न होणार आहे. त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी अनिश आणि ईशा डान्स करताना दिसतात. त्यानंतर यश आणि आरोही देखील डान्स करतात. देशमुख आणि केळकर कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळते. सर्वजण मजामस्ती करत असल्याचे पाहायला मिळते.
वाचा: मिया खलिफाचे झाले इस्रायली महिलेशी भांडण, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, साखरपुड्याला माया टीचरची एण्ट्री होते. तिला तेथे पाहून सर्वजण चकीत होतात. ती यश आणि ओरीहाला गिफ्ट आणते. त्यासोबतच मनूला देखील गिफ्ट आणते. ते पाहून आशुतोषला प्रचंड राग येतो. तो चिडतो आणि मायाला सुनावतो. त्यानंतर मनू आशुतोषसोबत अंगणात खेळत असते. तेवढ्यात माया तिथे येते. मनू मायाला देखील तेथे बोलावून घेते आणि ते तिघे खेळू लागतात. ते पाहून संजनाला थोडा धक्का बसतो. ती अरुंधतीला 'तुला मायापासून सावध राहण्याची गरज आहे' असे बोलते. माया मनूला इतकं जवळ का करते? तिच्या आणि मनूमध्ये नेमकं काय नातं आहे? याबाबत माहिती लवकरच मालिकेच्या आगामी भागामध्ये मिळणार आहे.