मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte 17th Jan: देशमुखांच्या घरात नवा ड्रामा, यश-आरोहीच्या साखरपुड्यात अडथळे

Aai Kuthe Kay Karte 17th Jan: देशमुखांच्या घरात नवा ड्रामा, यश-आरोहीच्या साखरपुड्यात अडथळे

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 17, 2024 01:27 PM IST

Aai Kuthe Kay Karte 17th Jan Serial Update: 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा…

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

'आई कुठे काय करते' मालिकेत सतत काही ना काही घडतच असते. मग ती अरुंधती असो वा अनिरुद्ध. मालिकेतील प्रत्येक पात्राच्या आयुष्यात गोष्टी घडत असतात. सध्या मालिकेत आरोही आणि यशचा साखरपुड्याची तयारी सुरु आहे. त्यांचा साखरपुडा होऊ नये यासाठी संजना प्रयत्न करत आहे. आता संजनाचे बिंग अरुंधतीने सर्वांसमोर आणले आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात ब्यूटी पार्लरमध्ये गेली असते. तिला येताना उशिर होतो त्यामुळे यशला ती सोडून तर गेली नाहीना असा प्रश्न पडला होता. अरुंधती त्याला समजावत असते. तेवढ्यात आरोही येते आणि यशला आनंद होतो. ते दोघे साखरपुडा करण्यासाठी घरात जातात. अनघा आणि अभी यशच्या साखरपुड्याची अंगठी शोधण्यासाठी बेडरुममध्ये जातात. त्यांना अंगठी सापडत नाही. दोघेही घाबरतात आणि खाली येऊन सांगतात. सगळेजण चकीत होतात. नेमकी अंगठी कुठे गेली असा प्रश्न सर्वांना पडतो.
वाचा: सनी लिओनीने सुरु केले नवे हॉटेल, जाणून घ्या कुठे आणि नाव काय?

संजना घरात आणखी ड्रामा तयार करते. ती आरोहीला हा साखरपुडा करु नकोस. देवालाही मान्य नाही. बघ. तू गौरीची जागा घेत आहेस असे बोलताना दिसते. तेवढ्यात आशुतोष ही नवी अंगठी घेऊ येतो असे सांगतो. अनिरुद्ध संजनाने अंगठी लपवली असल्याचे सांगतो. त्यानंतर अरुंधती तिच्या पर्समधून अंगठी काढते. ती अंगठी पाहून संजनाचा जळफळाट होतो. ती अरुंधतीवर चिडते की माझ्या कपाटाला हात कसा लावला असा प्रश्न विचारते. आता संजना नेमके काय करणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आता मालिकेत पुढे काय होणार? चला जाणून घेऊया...

WhatsApp channel

विभाग