'आई कुठे काय करते' मालिकेत सध्या यश आणि आरोहीच्या साखरपुड्याची तयारी सुरु आहे. देशमुख आणि केळकर कुटुंबीय त्या दोघांचा आनंद द्विगुणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या आनंदावर विरझण घालण्याचा प्रयत्न मात्र संजना करत आहे. आता आजच्या भागाच काय घडणार चला जाणून घेऊया...
'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात गुरुची साखरपुड्याला सुरुवात करतात. यशकडून पूजा करुन घेतात. त्यानंतर साखरपुड्याच्या अंगठीची पूजा करण्यासाठी अंगठ्या मागवतात. संजनाने यशची अंगठी लपवलेली असते. अरुंधती आरोहीची अंगठी देते. देशमुखांमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळते कारण यशची अंगठी सापडत नसते. अनिरुद्ध सतत संजनाला विनंती करतो की ती अंगठी परत कर, माझ्या मुलाच्या सुखाआड येऊ नकोस. मात्र, संजना ऐकायला तयार नसते. आता संजनाचे सत्य अरुंधती समोर आणणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: आमिर खानचा लेक जुनैद सध्या काय करतो?
दुसरीकडे आरोही आली नसल्यामुळे यशला असे वाटते की तिने साखरपुडा मोडला आहे. तो घडलेला प्रकार अरुंधतीला सांगतो. यशच्या मनात अनेक प्रश्न असतात. तेवढ्यात आरोही तेथे येते आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. आरोहीला आलेली पाहून यशला आनंदाश्रू अनावर होतात. आता त्या दोघांचा साखरपुडा होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.