मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte 16th Feb: संजना सोडणार देशमुखांचे घर? जाणून घ्या काय घडणार आजच्या भागात

Aai Kuthe Kay Karte 16th Feb: संजना सोडणार देशमुखांचे घर? जाणून घ्या काय घडणार आजच्या भागात

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 16, 2024 12:36 PM IST

Aai Kuthe Kay Karte 16th Feb Serial Update: 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा…

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

Aai Kuthe Kay Karte Update: गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' ही मालिका चर्चेत आहे. या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून सतत काहीना काही घडताना दिसत आहे. कधी मनूमुळे आशुतोष आणि अरुंधतीमध्ये भांडणे होताना दिसतात. तर कधी ईशा-अनिश यांच्यामध्ये राडे सुरु असतात. सध्या मालिका एका वेगळ्या वळणार जाऊन पोहोचली आहे. संजना आणि अनिरुद्धमध्ये टोकाचा वाद सुरु आहे. या सगळ्या वादाला कंटाळून संजना देशमुखांचे घर सोडून जाणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'आई कुठे काय करते' मालिकेत आजच्या भागात पाहायला मिळणार की संजना ही तिच्या आगामी इवेंटसाठी दुबईला चालली आहे. पण तिच्या या निर्णयाला अनिरुद्धने विरोध केला आहे. तसेच इवेंटसाठी मॉडेलला लागणा ड्रेस आणि त्यावर घालण्याची ज्वेलरी ही संजनाला कुरिअरने घरी पाठवली जाते. पण तिला आलेले पार्सल पाहून आजी आणि अनिरुद्धचा संताप होतो. कांचन आजी संजनाला घालून पाडून बोलतात. तसेच अनिरुद्ध देखील संजनाला तुझ्या मनाच्या गोष्टी करायच्या तर या घरातून निघून जा. इथे का राहाते असे प्रश्न विचारतो. त्यावर संजना देखील मी लवकरच इथून जाणार आहे. फक्त मनाची तयारी करत आहे असे उत्तर देते. संजनाचे वागणे पाहून कांचन आजीला राग अनावर होतो.
वाचा: आयएएस पत्नी छळतेय! टीव्हीचे ‘कृष्ण’ नितीश भारद्वाज यांची पोलिसांत धाव

दुसरीकडे केळकरांच्या घरी थोडे वातावरण शांत वाटते. मनू सकाळी उठून देशमुखांकडे असलेल्या पूजाला जाण्याचा निर्णय घेते. सगळेजण पूजेची तयारी करत असतात. तेवढ्यात अरुंधती तिन्ही मुलांचे कौतुक करते. आता ती मोठी झाली आहेत. पण पुन्हा मनूची जबाबदारी घ्यावी लागणार असल्याचे म्हटले. ते ऐकून आशुतोषला राग येतो. नाही टाकणार मनूची जबाबदारी तुझ्यावर असे बोलून तेथून निघून जातो. आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

IPL_Entry_Point

विभाग