मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte: आशुतोष सांगणार मायाचे सत्य, काय असेल अरुंधतीची प्रतिक्रिया

Aai Kuthe Kay Karte: आशुतोष सांगणार मायाचे सत्य, काय असेल अरुंधतीची प्रतिक्रिया

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 15, 2024 01:24 PM IST

Aai Kuthe Kay Karte 15th March Serial Update: 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार? त्यासाठी वाचा ही बातमी

आशुतोष सांगणार मायाचे सत्य, काय असेल अरुंधतीची प्रतिक्रिया
आशुतोष सांगणार मायाचे सत्य, काय असेल अरुंधतीची प्रतिक्रिया

Aai Kuthe Kay Karte Serial Update: 'आई कुठे काय करते' मालिकेत सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अरुंधतीच्या आयुष्यात माया नावाचे वादळ आले आहे. तर दुसरीकडे संजना स्वत:च्या हक्कासाठी अनिरुद्धशी भांडताना दिसत आहे. आता मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार? हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही अरुंधती आणि संजनाच्या संवादाने होती. अरुंधती अभीला घेऊन देशमुखांच्या घरी गेली आहे. आशुतोष देखील तेथे आला आहे. तो सर्वांसमोर अरुंधतीची बाजू घेऊन बोलतो. पण संजना मात्र अरुंधतीला हे सगळं फार काळ चालणार नाही असे सांगते. कारण माया आशुतोषच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करत आहे. ती अरुंधतीला सावध राहण्यासा सल्ला देते. तसेच जमले तर कधी आशुतोषला नेमके काय घडले हे विचारण्याचा अग्रह करते. त्यावर अरुंधती एकच उत्तर देते की या सगळ्याची गरज नाही, माझा आशुतोषवर विश्वास आहे. त्यानंतर ती अरुंधतीला देशमुख कुटुंबीयांपासून लांब राहण्यास देखील सांगते.
वाचा: ‘लापता लेडीज’ सिनेमा कसा आहे? सलमान खानने दिला रिव्ह्यू

दुसरीकडे आशुतोषचा वाढदिवस असतो त्यामुळे सुलेखा ताई, अनिश आणि माया त्याला सरप्राइज देण्यासाठी तयारी करत असतात. या सगळ्यात मायाचा उत्साह पाहून नितीन आणि अनिशला धक्का बसतो. सुलेखा ताईंना सतत असे वाटते की आशुतोषने मायाला जवळ करावे कारण अरुंधती या कुटुंबाला फार वेळ देत नाही. ती आजही देशमुखांमध्ये गुंतलेली आहे. पण आशुतोषचे मात्र अरुंधतीवर प्रचंड प्रेम आहे. तो अरुंधतीशिवाय त्याच्या आयुष्याची कल्पनाही करु शकत नाही. तसेच या सगळ्यात तो अरुंधती सगळे सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो. मात्र, अरुंधीताचा असलेला विश्वास पाहून ती आशुतोषही चकीत होतो. आता मालिकेच्या आगामी भागात नेमके काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाचा: ओटीटीवर एकाच दिवशी प्रदर्शित होणार तब्बल ८ सिनेमे अन् वेब सीरिज, तारीख नोट करा!

अभीचा अपघात झाला आहे आणि ती भरतात येऊन काही दिवस झाल्याचे कळताच सुरुवातीला अनघाला धक्का बसतो. पण आता अनघा अभीला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि पुन्हा नव्या आयुष्याला सुरुवात करते. तिला अभीच्या येण्याने आनंद झाला आहे. तिच्या चेहऱ्यावरील हास्य परतले आहे.

IPL_Entry_Point