मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte 15th Jan: यशचा साखरपुडा होणार की मोडणार? काय घडणार आजच्या भागात

Aai Kuthe Kay Karte 15th Jan: यशचा साखरपुडा होणार की मोडणार? काय घडणार आजच्या भागात

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 15, 2024 03:21 PM IST

Aai Kuthe Kay Karte 15th Jan Serial Update: 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा…

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

'आई कुठे काय करते' मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत यशने आरोहीशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे गौरीला कळताच तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत संजनाला कळताच तिने अरुंधती आणि आरोहीला या घटनेच्या दोषी असल्याचे म्हटले. आता संजना आरोही आणि यशचा साखरपुडा मोडण्यासाठी हवे ते प्रयत्न करताना दिसत आहे. आता यश आणि आरोहीचा साखरपुडा होणार की मोडणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात आरोही आणि अनिश यशला अगदी सहज फोन करतात. तेव्हा यशला त्याच्या बेडवर गौरीचे पत्र सापडते आणि तो ते वाचत असतो. ते वाचत असतानाच आरोहीचा फोन येतो. तेवढ्यात यश आरोहीचे नाव घेण्याऐवजी चुकून गौरीचे नाव घेतो. ते ऐकून आरोहीला वाईट वाटते. ती यशला तुझा निर्णय चुकतोय. तू आजही गौरीमध्ये गुंतला आहेस असे बोलून रागाने निघून जाते. यश अनिशला विनंती करतो की आरोहीला समजाव. पण आता आरोही काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाचा: आयराच्या रिसेप्शनमधील श्रुती हासनच्या 'त्या' कृतीने जिंकली चाहत्यांची मने

दुसरीकडे देशमुख कुटुंबीय यशच्या साखरपुड्याची तयारी करत असतात. अभी आणि अनिरुद्ध घराची सजावट करतात. तेवढ्यात त्यांच्या घरी ब्राह्मण येतात. ते सांगतात यश आणि आरोहीची पत्रिका जुळत नाहीये. हा साखरपुडा करु नका. तेव्हा अप्पा आणि अरुंधती हे महत्त्वाचे नाहीये सांगत त्यांच्या साखरपुड्याची तयार करतात. दरम्यान, यशच्या साखरपुड्याची अंगठी गायब असते. ती अंगठी संजनाने लपवली असे अनिरुद्धला वाटते.

WhatsApp channel

विभाग