Aai Kuthe Kay Karte Serial Update: मालिका विश्व गाजवणारी सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते.' ही मालिका सर्वात जास्त पाहिली जायची. पण आता मालिका टीआरपी यादीतून घसरली आहे. त्यामुळे मालिकेच्या वेळातही बदल करण्यात आला आहे. सध्या मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत आशुतोष आणि अरुंधतीच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. पण त्या दोघांमध्ये माया आली असून सुलेखा ताई अरुंधतीची जागा मायाला देण्याचा प्रयत्न करत आहेत. आता आजच्या भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही देशमुखांच्या घरापासून होते. सर्वजण अभीची प्रकृती ठिक नसल्यामुळे अरुंधतीला तेथेच थांबण्याचा आग्रह करत असतात. जेणेकरुन अनिरुद्ध आणि कांचन आजीचा अरुंधतीला पुन्हा देशमुखांच्या आयुष्यात आणण्याचा डाव पूर्ण होईल. अरुंधती या सगळ्याला विरोध करते. तसेच अप्पा देखील सर्वांना जाणीव करुन देतात की अरुंधतीचा वेगळा संसार आहे. तिला तिची माणसे आणि संसार सांभाळायचा असतो. त्यानंतर गरज नसताना संजना तेथे येते आणि अरुंधतीची देशमुखांना गरज नाही हे सांगण्याचा प्रयत्न करते. पण सर्वजण तिच्या मताशी असहमत असतात. तेवढ्यात आशुतोष तेथे येतो आणि संजनाला चांगलेच सुनावते. सगळ्यात शेवटी संजना अरुंधतीला सल्ला देते की मायापासून थोडे लांब रहा. कारण ती तुझ्या आणि आशुतोषमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे. आता या सगळ्यावर अरुंधती काय करणार हे मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे.
वाचा: 'तो काय काम करतो हे मलाही...', सेलिब्रिटींसोबत दिसणाऱ्या ऑरीबाबत रणवीरचे वक्तव्य
दुसरीकडे आशुतोषचा वाढदिवस जवळ आला आहे. त्यामुळे अरुंधती तो साजरा करण्यासाठी देशमुखांना आमंत्रण देते. तसेच माया देखील आशुतोषचा वाढदिवस असतो म्हणून सुलेखा ताईंसोबत प्लान बनवते. पण या सगळ्यात सुलेखाताई अरुंधतीला पूर्णपणे विसरुन जातात. त्या दोघींचे वागणे पाहून अनिशला देखील धक्का बसतो. आता आशुतोष त्याचा वाढदिवस कोणासोबत साजरा करणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आगामी भागाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
संबंधित बातम्या