'आई कुठे काय करते' मालिकेत आरोहीची एण्ट्री झाल्यापासून अनेक वेगवेगळी येताना दिसत आहेत. यश हा आरोहीच्या प्रेमात असून त्याने तिला लग्नाची मागणी घातली. हे पाहून कांचन आजीने आरोहीचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला आहे. आजीच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. आता मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
'आई कुठे काय करते' मालिकेत अप्पांनी कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यासाठी घरी पार्टीचे आजोजन केले आहे. या पार्टीला कांचन आजी माधव नावाच्या एका व्यक्तीला बोलवते आणि त्याचे लग्न आरोहीशी लावून देण्याचा निर्णय घेते. आजीच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसतो. त्यांनी हा निर्णय का घेतला हे यशने सर्वांसमोर उघड केले आहे. 'आई मला आरोही आवडते. मला तिच्याशी लग्न करायचे आहे. म्हणून आजी अशी वागते' असे यश म्हणतो. कांचन आजीला हेच नको असते. अरुंधतीला हे ऐकून धक्का बसतो. ती यशला विचारते मला का नाही सांगितलं. इतकं सगळं झाल्यानंतर.
वाचा: अनन्या पांडेने केली मोठी खरेदी, चाहत्यांना दिली गूडन्यूज
अनिरुद्धने यशच्या निर्णयाला विरोध केला आहे. तसेच अभीने देखील तू चुकतोय असे म्हटले. त्यानंतर संजनाने 'तू हे सगळं करत असताना आरोहीचा विचारही केला नाही' असे म्हटले. त्यानंतर तिने आजींना देखील सुनावले. प्रत्येक मुलीला तिच्या आयुष्यातले निर्णय घेण्याची सवलत असते. तिचे निर्णय तिने घ्यावेत असे थेट अनघा बोलते. सगळ्यांचे सल्ले ऐकून कांचन आजी सर्वांना ऐकवते. हे सगळं ऐकल्यावर अरुंधती थेट यशला प्रश्न विचारते तुला आरोहीशी लग्न करायचे आहे की नाही? त्यावर यश होकार देतो. त्यानंतर हाच प्रश्न अरुंधती आरोहीला विचारते. त्यावर ती थेट नकार देते.
'लग्नाचा विषय काढला तर इथे काय झालं. आपलं लग्न झालच तर काय होईल? आपला संसार सुखाचा नाही होणार. मला माफ कर' या शब्दात ती यशला सुनावते. त्यानंतर ती कांचन आजीला देखील सुनावते. आता मालिकेत पुढे काय होणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.