'आई कुठे काय करते' मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत यशने आरोहीशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे गौरीला कळताच तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत संजनाला कळताच तिने अरुंधती आणि आरोहीला या घटनेच्या दोषी असल्याचे म्हटले. तसेच गौरीला पुन्हा परदेशात पाठवून दिले. या सगळ्यानंतर यश आणि आरोहीने साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात यश आणि आरोहीच्या साखरपुड्याची जोरदार तयारी सुरु असल्याचे दिसत आहे. केळकर कुटुंबीय आरोहीच्या मेहंदी सोहळ्याची तयारी करत असतात. तर दुसरीकडे यशच्या घरी देखील देशमुख मेहंदीचा कार्यक्रम करत असतात. अभी उद्या कॅनडाला जाणार असतो म्हणून कांचन आजी नाराज असतात. अनघा त्यांची कशीबशी समजूत काढून त्यांना मेहंदी सोहळ्यात सहभागी करुन घेते.
वाचा: हृतिकच्या वाढदिवसानिमित्त गर्लफ्रेंड सबाने शेअर केला लिपलॉक व्हिडाओ
यश आणि आरोहीमध्ये फोनवर गप्पा सुरु असतात. दोघेही प्रेमात असल्याची कबूली फोनवर देतात. तेवढ्यात यशला त्याच्या बेडवर एक पत्र मिळते. हे पत्र त्याला गौरीने लिहिले आहे हे कळते. अनिरुद्ध मात्र मागून यश पत्र वाचत असल्याचे पाहातो. आता गौरीने लिहिलेल्या पत्रामुळे यशचा निर्णय बदलणार का? की तो आरोहीसोबत साखरपुडा करणार हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार.
दुसरीकडे आशुतोष हा मनूची चिंता करत असतो. अरुंधतीने मायाला साखरपुड्याला बोलावल्यामुळे त्याचा हिरमोड होतो. तो अरुंधतीशी भांडतो आणि रागाच्या भरात तेथून निघून जाते. आता मालिकेत पुढे काय होणार? याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
संबंधित बातम्या