मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte 13th Feb: मनूने केली अरुंधती आणि आशुतोषची निवड, आता काय असेल मायाची चाल?

Aai Kuthe Kay Karte 13th Feb: मनूने केली अरुंधती आणि आशुतोषची निवड, आता काय असेल मायाची चाल?

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 13, 2024 04:09 PM IST

Aai Kuthe Kay Karte 13th Feb Serial Update: 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा…

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

Aai Kuthe Kay Karte update: गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' ही मालिका चर्चेत आहे. या मालिकेत मनू आणि मायाची एण्ट्री झाल्यापासून मालिका रंजन वळणावर पोहोचली आहे.माया मनूला घेऊन जाण्यासाठी केळकरांच्या घरात राहात आहे. तिला मनूच्या मनात वेगळी जागा निर्माण करायची आहे. पण मनूने मात्र वेगळाच निर्णय घेतला आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात अरुंधती आणि माया यांच्यामधील संवाद आशुतोषसाठी त्रासदायी ठरतो. तो अरुंधतीवर चिडतो तिला वाटेल तसे बोलतो. पण अरुंधती नेहमीप्रमाणे गपगुमान ऐकून घेते आणि आशुतोषला समजावण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर मनूचे भूकेने डोके दुखत असते. माया तिच्यासाठी पास्ता बनवते आणि अरुंधती शिरा. अरुंधतीने तो शिरा भरवावा असा हट्ट मनू करते. माया देखील मनूला भरवण्याचा प्रयत्न करते. मात्र, मनू काही ऐकेना. ती अरुंधतीलाच तो भरवण्यास सांगते. त्यानंतर मनू सर्वांसमोर अरुंधतीला विचारते मी तुला आई म्हणू का आणि जादूगारला बाबा. ते ऐकून मायाचा जळफळाट होतो तर अरुंधती आणि आशुतोष खूश होतात. हे सगळं पाहून आता मायाचा पुढे काय करणार हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
वाचा: अभिनेता अर्शद वारसी पुन्हा लग्न करणार! तारीख ठरली

दुसरीकडे देशमुखांच्या घरात ईशा ही नवा ड्रामा करत आहे. ईशाला पैशांची गरज असते. ती एका टोपारी गुंडा सारख्या माणलाकडून १२ टक्के व्याजाने पैसे घेण्याचा निर्णय घेते. ही व्यक्ती ईशाला हे पैसे देण्यासाठी तिच्या घरी येते. पण या व्यक्तीचा अवतार पाहून सर्वजण चकीत होतात. या अशा गुंडाला घरी बोलावल्यामुळे देशमुख कुटुंबीय नाराज होतात. ते ईशाला समजावण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ईशा कोणाचे काही ऐकायाच्या मनस्थितीमध्ये नसते. आजच्या भागात यश देखील इशाला समजावतो. पण ऐकेल तर ती ईशा कुठली.

दरम्यान, अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्यात देखील फूट पडली आहे. संजनाला शोसाठी दुबईला जायचे असते. पण अनिरुद्ध तिला अट घालतो. जर तू दुबईला निघून गेलीस तर या घरात पुन्हा पाऊल टाकायचे नाही. आता काय असे संजनाचा निर्णय हे आगामी भागात कळेल.

WhatsApp channel