Aai Kuthe Kay Karte Serial Update: कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. माया आल्यापासूनच आशुतोषच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. आता सुलेखा ताईंना देखील ते दिसत आहे. तसेच अरुंधती सारखी देशमुखांच्या घरी जाते आणि मनूची जबाबदारी झटकते असे त्यांना वाटत आहे. त्यामुळे आता मालिकेच्या आगामी भागात नेमकं काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात मनूला ताप आला आहे. आशुतोष तिची काळजी घेत असतो. माया देखील मनूची चौकशी करण्यासाठी आशुतोषच्या खोलीत येते. तेव्हा त्या दोघांमध्ये जवळीक निर्माण होते. नेमकं सुलेखा ताई ते पाहतात आणि आशुतोषला काही प्रश्न विचारतात. आशुतोष सुलेखा ताईंना अरुंधतीवर मनापासून प्रेम असल्याचे सांगतो. तसेच पुढचे संपूर्ण आयुष्य हे अरुंधतीसोबत घालवण्याची इच्छा असल्याचे देखील सांगतो. पण मनूची योग्य काळजी ही मायाच घेऊ शकते असे सुलेखा ताईंना वाटते. माया या गोष्टीचा फायदा घेते आणि सुलेखा ताईंशी गोड बोलायला लागते. मायाचा हा डाव यशस्वी होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. खरच आशुतोषच्या आयुष्यात अरुंधतीची जागा माया घेणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा; वयाच्या ५०व्या वर्षी सिद्धू मुसेवालाची आई देणार मुलांना जन्म, वडिलांनी केली पोस्ट
दुसरीकडे अभीचा अपघात होतो आणि त्याच्या फोनमधील अरुंधतीच्या नंबरवर डॉक्टर फोन करुन सांगतात. दुसरीकडे अनिरुद्धला पोलिस ठाण्यातून अभीने केलेला प्रकार कळतो. तो अभीचा जामीन करुन घरी परतो आणि अनघाची माफी मागतो. या सगळ्या प्रकारानंतर सर्वजण अभीला सत्य विचारतात. पण अभी ते सांगण्यास नकार देतो. थोड्या वेळाने तो छकूलीच्या डोक्यावर हात ठेवून खरे बोलण्यासही नकार देतो. अनघावर ओढावलेली परिस्थिती पाहून शेवटी तो सत्य सांगतो. कॅनडाला तो ज्या हॉस्पिटलमध्ये जातो त्या हॉस्पिटलमध्ये चुकीची कामे सुरु असतात. जेव्हा अभीला याबाबत कळते तेव्हा तो तेथून पळून येण्याचा निर्णय घेतो. पण तेथील काही लोकांना याबाबत माहिती मिळते. ते अभीला तेथेच दांबून ठेवतात. अभी कसेबसे करुन भारतात परत येतो. आता हे सगळे ऐकून अनघा त्याला पुन्हा माफ करेल का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
संबंधित बातम्या