Aai Kuthe Kay Karte Serial Update: कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका कायमच चर्चेत राहिली आहे. ही मालिका सध्या टीआरपी यादीमध्ये घसरली असली तर प्रेक्षकांना अरुंधती आणि तिच्या आयुष्यात सुरु असणाऱ्या गोष्टींविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुकता असते. सध्या मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. अरुंधतीचा मोठा मुलगा अभी परदेशात स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेला असतो. पण तिच्यासोबत असे काही घडते की तो भारतात पळून येतो. त्याच्या वर कॅनडामधून भारतात पळून आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता अभीने सर्वांना सत्य सांगितले आहे. ते ऐकून अनघा त्याला माफ करणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात अरुंधती अभीला घेऊन देशमुखांच्या घरी आली आहे. अभीचा अपघात होतो आणि त्याच्या फोनमधील अरुंधतीच्या नंबरवर डॉक्टर फोन करुन सांगतात. दुसरीकडे अनिरुद्धला पोलिस ठाण्यातून अभीने केलेला प्रकार कळतो. तो अभीचा जामीन करुन घरी परतो आणि अनघाची माफी मागतो. या सगळ्या प्रकारानंतर सर्वजण अभीला सत्य विचारतात. पण अभी ते सांगण्यास नकार देतो. थोड्या वेळाने तो छकूलीच्या डोक्यावर हात ठेवून खरे बोलण्यासही नकार देतो. अनघावर ओढावलेली परिस्थिती पाहून शेवटी तो सत्य सांगतो. कॅनडाला तो ज्या हॉस्पिटलमध्ये जातो त्या हॉस्पिटलमध्ये चुकीची कामे सुरु असतात. जेव्हा अभीला याबाबत कळते तेव्हा तो तेथून पळून येण्याचा निर्णय घेतो. पण तेथील काही लोकांना याबाबत माहिती मिळते. ते अभीला तेथेच दांबून ठेवतात. अभी कसेबसे करुन भारतात परत येतो. आता हे सगळे ऐकून अनघा त्याला पुन्हा माफ करेल का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला जावई बनण्यास बोनी कपूरचा नकार?
दुसरीकडे मनूला ताप आला आहे. आशुतोष तिची काळजी घेत असतो. माया देखील मनूची चौकशी करण्यासाठी आशुतोषच्या खोलीत येते. तेव्हा त्या दोघांमध्ये जवळीक निर्माण होते. नेमकं सुलेखा ताई ते पाहतात आणि आशुतोषला काही प्रश्न विचारतात. आशुतोष त्यांना अरुंधतीवर मनापासून प्रेम असल्याचे सांगतो. तसेच पुढचं आयुष्य हे अरुंधतीसोबत घालवण्याची इच्छा असल्याचे देखील सांगतो. त्यामुळे आता सुलेखा ताईंच्या मनात नेमकं काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.