Aai Kuthe Kay Karte update: गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' ही मालिका चर्चेत आहे. या मालिकेत मनू आणि मायाची एण्ट्री झाल्यापासून मालिका रंजन वळणावर पोहोचली आहे.माया मनूला घेऊन जाण्यासाठी केळकरांच्या घरात राहात आहे. तिला मनूच्या मनात वेगळी जागा निर्माण करायची आहे. आता मायाला या सगळ्यात यश मिळणार का? असा प्रश्न पडला आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात अरुंधती आणि माया यांच्यामधील संवाद लक्षवेधी ठरणार आहे. अरुंधती मायाला १५ दिवसांचा कालावधी देते. या कालावधीमध्ये तिला मनूच्या मनात जागा करण्यास सांगते. तसेच मनूचा विश्वास जिंकणे शक्य झाले तर तेही कर असे अरुंधती बोलताना दिसत आहे. पण १५ दिवसांनंतर मनू ज्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेणार तो सगळ्यांना मान्य असणार अशी शपथ देखील घेते. या सगळ्यानंतर माया मोठा खेळ खेळते. ती मनूला १५ दिवसांसाठी तिच्या फार्म हाऊसवर घेऊन जायचा निर्णय घेते. आशुतोष या निर्णयाला विरोध करतो पण या सगळ्याला अरुंधतीने परवानगी दिल्याचे माया सांगते. हे ऐकून आशुतोषला आणखी राग अनावर होतो. तो अरुंधतीला वाटेल तसे बोलतो. पण अरुंधतीला त्याला समजावण्याचा जो प्रयत्न करत असते त्यात अपयशी ठरते. आता मनू कोणाची निवड करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाचा: वयस्कांच्या अस्तित्वाची गोष्ट; 'आता वेळ झाली'चा भावूक करणारा ट्रेलर प्रदर्शित
दुसरीकडे देशमुखांच्या घरात ईशा ही नवा ड्रामा करत आहे. ईशाला पैशांची गरज असते. ती एका टोपारी गुंडा सारख्या माणलाकडून १२ टक्के व्याजाने पैसे घेण्याचा निर्णय घेते. ही व्यक्ती ईशाला हे पैसे देण्यासाठी तिच्या घरी येते. पण या व्यक्तीचा अवतार पाहून सर्वजण चकीत होतात. या अशा गुंडाला घरी बोलावल्यामुळे देशमुख कुटुंबीय नाराज होतात. ते ईशाला समजावण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ईशा कोणाचे काही ऐकायाच्या मनस्थितीमध्ये नसते.