मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte 11th Jan: आरोही-यशला धडा शिकवण्यासाठी संजनाले लपवली अंगठी, अनिरुद्धने पाहिले अन्...

Aai Kuthe Kay Karte 11th Jan: आरोही-यशला धडा शिकवण्यासाठी संजनाले लपवली अंगठी, अनिरुद्धने पाहिले अन्...

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 11, 2024 12:17 PM IST

Aai Kuthe Kay Karte 11th Jan Serial Update: 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा…

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

'आई कुठे काय करते' मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. आरोही आणि यशने अखेर प्रेमाची कबूली दिली असून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अरुंधतीने दोघांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. मात्र, कांचन आजीने नेहमी प्रमाणे विरोध केला. त्यानंतर मालिकेत पुन्हा गौरीची एण्ट्री झाली आहे. गौरीने यशचा निर्णय ऐकून स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला हे ऐकून संजनाच्या मनाता यश, आरोही, अरुंधतीविरोधात द्वेष निर्माण केला आहे.

'आई कुठे काय करते' आजच्या भागात आरोही ही यशच्या रुममध्ये जाते आणि त्याचे कपाट लावते. त्यावेळी अरुंधती आणि तिच्यामध्ये छान गप्पा होतात. त्यानंतर आरोहीला कपाटात गौरीने यशला दिलेली अंगठी सापडते. तेवढ्यात संजना तेथे आणि आरोहीला भडकवण्याचा प्रयत्न करते. पण आरोही मात्र संजनाचे तोंड बंद करुन गौरीने दिलेली अंगठी तिला परत करुन टाकते. आरोहीचे बोलणे पाहून संजनाला धक्काच बसतो.
वाचा: लेकीच्या संगीत सोहळ्यात आमिर खान, किरण आणि आझादने गायले गाणे Video Viral

त्यानंतर अभी कॅनडाला जाण्यासाठी बॅग भरत असतो. त्यावेळी तो जानकीचा फोटो भरतो आणि भावूक होतो. त्यावेळी अरुंधती त्याला पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करते की इतका त्रास होतोय तर जाऊ नकोस. मात्र अभी कोणाचेही ऐकण्यास तयार नसतो. त्यानंतर संजना कपाटातून यश आणि आरोहीची अंगठी लपवण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात अनिरुद्ध तेथे येतो आणि तिला तू असे का करत आहेस? विचारतो. त्यावर ती यश आणि आरोहीला धडा शिकवण्यासाठी हे करत असल्याचे सांगते. ते ऐकून अनिरुद्ध चकीत होतो. आता अनिरुद्धचा काय असेल पाऊल हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

WhatsApp channel

विभाग