मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte 10th Jan: ईशा आणि अनिश घेणार घटस्फोट? मालिकेत रंजक वळण

Aai Kuthe Kay Karte 10th Jan: ईशा आणि अनिश घेणार घटस्फोट? मालिकेत रंजक वळण

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 10, 2024 01:03 PM IST

Aai Kuthe Kay Karte 10th Jan Serial Update: 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा…

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

'आई कुठे काय करते' मालिकेत सतत काही तरी घडताना दिसत आहे. कधी आशुतोष अरुंधतीमध्ये काही तरी सुरु असते तर कधी यश, अभी, ईशाच्या आयुष्यात सावळा गोंधळ सुरु असतो. गेल्या काही दिवसांपासून ईशाचे वागणे हे अनिशला खटकत आहे. त्या दोघांमध्ये जराही एकमत होताना दिसत नाही. आता त्या दोघांचा घटस्फोट होणार की काय? असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना पडला आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात आरोही आणि यशच्या साखरपुड्याची जोरदार तयारी सुरु असल्याचे दिसत आहे. सर्वजण शॉपिंग करत आहेत, काय हवं नको ते पाहात आहेत. या सगळ्याला संजना नकार देतेच. पण तरीही सर्वजण तिच्याकडे दुर्लक्ष करुन यशच्या आनंदात सहभागी होतात. दुसरीकडे आशुतोषच्या ऑफिसमध्ये मनू जाते. त्या दोघांमध्ये मजामस्ती सुरु असताना तेथे अचानक माया पोहोचते. ते पाहून आशुतोषला धक्का बसतो. माया तिथे का आली आहे? असा प्रश्न आशुतोषला पडला आहे.
वाचा: "आत्मनिर्भर भारत", लक्षद्वीप-मालदीव वादात कंगणा राणौतची उडी

आज अचानक ईशा देशमुखांच्या घरी जाते. ती अनिशला विचारते तू मला घ्यायला का आला नाहीस, तुझे माझ्यावर प्रेम आहे की नाही. तू माझ्याशिवाय राहायला शिकला आहेस असे ईशा बोलते. त्यावर अनिश तिला समजावण्याचा प्रयत्न करतो की तू फक्त सगळ्यांच्या बाबतीत नकारात्मक विचार करत आहेस. जर तू अशीच वागत राहिलीस तर मी तुला घटस्फोट देण्यास तयार आहे. पण कधी तरी माझा विचार केला आहेस का? तुझ्याशिवाय मला किती एकटे वाटत असेल. माझे तु्झ्यावर प्रेम होते म्हणून मी तुझ्यासोबत लग्न केले आहे. पण तू माहेरी जाऊन राहात आहेस. कधी तरी मी बोलतोय त्याचा शांत विचार कर. आता ईशा अनिशला घटस्फोट देणार की पुन्हा केळकरांच्या घरी येणार हे मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे.

WhatsApp channel

विभाग