छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते.' या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तसेच या मालिकेतील प्रत्येक पात्राने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता या मालिकेतील एका अभिनेत्रीने आनंदाची बातमी शेअर केली आहे. या अभिनेत्रीने दिवाळीच्या मुहूर्तावर नवी कार खरेदी केली आहे. या अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.
दिवाळी हा सण संपूर्ण भारतात मोठ्या थाटामात साजरा केला जातो. सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वचजण दिवाळी साजरी करतात. अनेकजण दिवाळीच्या मुहूर्तावर घर, गाडी, मौल्यवान वस्तू खरेदी करताना दिसतात. आता 'आई कुठे काय करते' मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेने नवी लग्झरी कार खरेदी केली आहे. तिने हा कार खरेदी केल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
अभिनेत्री रुपाली भोसलेने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर गाडी खरेदी केली आहे. तिने सोशल मीडियावर गाडीचा व्हिडीओ शेअर करत याविषयी चाहत्यांना माहिती दिली आहे. रुपालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती संपूर्ण कुटुंबासह कार खरेदी करायला गेल्याचे पाहायला मिळत आहेत. फटाके फोडत, गाडीची पूजा करत आणि केक कापत त्यांनी या गाडीचे जंगी स्वागत केले आहे.
वाचा: 'दृष्ट लागण्या जोगे सारे' गाण्यातील अभिनेत्रीला खरोखरच लागली दृष्ट? अगदी कमी वयात घेतला जगाचा निरोप
सोशल मीडियावर रुपाली भोसलेच्या कारचा नवा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने “खूप खूप अभिनंदन” असे म्हणत रुपालीला शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसऱ्या एका यूजरने “तुमचा शून्यातून इथपर्यंतचा प्रवास खरोखर प्रेरणादायी आहे” असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने “वाह खूप छान. अभिनंदन आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा” अशी कमेंट केली आहे.