मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  दीपाली सय्यद ते आदेश बांदेकर, अभिनयासोबत राजकारणातही सक्रिय आहेत हे मराठी कलाकार

दीपाली सय्यद ते आदेश बांदेकर, अभिनयासोबत राजकारणातही सक्रिय आहेत हे मराठी कलाकार

Payal Shekhar Naik HT Marathi
Jun 25, 2022 05:49 PM IST

काही कलाकार आहेत ज्यांनी राजकारणातही प्रवेश केला. मराठी चित्रपटसृष्टीमधील आपलं करियर आणि राजकारण यांचा मेळ बसवणं त्यांना व्यवस्थित जमलं.

marathi actors active in politics
marathi actors active in politics

मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अभिनयासोबत समाजात बदल घडवून आणण्यासाठी आणि वेगळं काही करण्यासाठी निराळी वाट धरली. त्यातील काही कलाकार आहेत ज्यांनी राजकारणातही प्रवेश केला. मराठी चित्रपटसृष्टीमधील आपलं करियर आणि राजकारण यांचा मेळ बसवणं त्यांना व्यवस्थित जमलं. दीपाली सय्यद ते आदेश बांदेकरांपर्यंत जाणून घेऊया अशा कलाकारांबद्दल ज्यांनी राजकारणातही यशाची चव चाखली

दीपाली सय्यद

लोकप्रिय अभिनेत्री दीपाली सय्यद हिने नुकताच राजकारणात प्रवेश केला आहे. दिपालीने काही वर्षांपूर्वी अभिनयातून ब्रेक घेतला होता. आता मात्र ती अभिनयासोबतच राजकारणातही बरीच सक्रिय असते. ती अनेक मोर्चे आणि आंदोलनामध्येही सहभागी असते.

सुशांत शेलार

'बिग बॉस १' मधील अभिनेता सुशांत शेलार देखील गेल्या काही काळापासून राजकारणात सक्रिय आहे. सुशांत अनेकदा फंड गोळा करून समाजातील अनेक लोकांची मदत करताना दिसतो. सोबतच तो चित्रपटसृष्टीतील अनेकांच्या अडचणी सोडवताना दिसतो. करोना काळात अनेक कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी सुशांतने मदत केली आहे.

अमोल कोल्हे

 

अमोल कोल्हे यांनी गेली कित्येक वर्ष खासदार म्हणून पद भूषवलं आहे. ते अभिनय आणि राजकारण यांचा योग्य मेळ घालताना दिसतात.

 

आदेश बांदेकर

लोकप्रिय अभिनेते आदेश बांदेकर देखील गेली अनेक वर्ष राजकारणात सक्रिय आहेत. आदेश हे राजकीय पक्षाचे सचिव आहेत. ते पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम पाहतात.

नित्यश्री ज्ञानलक्ष्मी

मराठी अभिनेत्री नित्यश्री ज्ञानलक्ष्मी ही 'लक्ष्मी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ती देखील राजकारणात सक्रिय आहे. ती सध्या एका वेल्फेअर सोसायटी सोबत काम करत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग