मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  २० वर्षांत बायकोला किती पैठण्या दिल्या?; आदेश बांदेकर यांनी दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

२० वर्षांत बायकोला किती पैठण्या दिल्या?; आदेश बांदेकर यांनी दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 04, 2024 07:52 PM IST

आदेश बांदेकर यांनी नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये पैठणी साडीचा किस्सा सांगितला आहे. त्यांनी पत्नीला आतापर्यंत किती पैठणी दिल्या याबाबत मीहिती दिली आहे.

२० वर्षांत बायकोला किती पैठण्या दिल्या?; आदेश बांदेकर यांनी दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष
२० वर्षांत बायकोला किती पैठण्या दिल्या?; आदेश बांदेकर यांनी दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

महाराष्ट्रातील घरोघरी संध्याकाळच्या वेळी “दार उघड बये, दार उघड…” हे शीर्षक गीत ऐकू येत. या गाण्यावरुन समजून जायचे की आदेश बांदेकरांचा होम मिनिस्टर कार्यक्रम चालू आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील बाई हा कार्यक्रम पाहाते आणि या कार्यक्रमाचा भाग होण्याची स्वप्ने पाहाते. गेल्या २० वर्षांपासून आदेश बांदेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करताना दिसत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची लाडके भावोजी म्हणून ओळख निर्माण झाली आहे. आता एका मुलाखतीमध्ये आदेश बांदेकर यांना 'पत्नीला गेल्या २० वर्षात किती पैठण्या दिल्या' असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आदेश बांदेकर यांनी नुकताच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाचे अनेक किस्से सांगितले आहेत. दरम्यान, त्यांना “गेल्या २० वर्षांत महाराष्ट्राच्या घराघरांत पैठणी घेऊन जाणाऱ्या आदेश बांदेकरांनी सुचित्रा यांना किती पैठण्या दिल्या आहेत?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर आदेश बांदेकर यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वाचा: ‘या’ सेलिब्रिटीने घेतलं ईशा अंबानी-आनंद पिरामल याचं अमेरिकेतील घर, ५०० कोटी रुपयांचा केला करार

आदेश बांदेकर यांचे मजेशीर उत्तर

“सध्या मी सुचित्राला साड्या घेतच नाही. कारण, ती साडी खरेदी करुन थेट मला बिले आणून दाखवते. पैठणी साडीची महाराष्ट्रात महावस्त्र म्हणून ओळख आहे. अशी ही पैठणी जेव्हा एखाद्या माऊलीच्या अंगावर जाते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे तेज आणि आनंद हे खूप जास्त असते. अगदी तसेच तेज माझ्याही घरात असावे असे मला वाटणे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे मी स्वत: जाऊन एक – दोन वेळा तिला पैठणी साडी जाऊन आणली होती. पण, त्यानंतर आता ती स्वत: साड्या खरेदी करते. त्यानंतर मला दाखवते” असे आदेश बांदेकर म्हणाले.
वाचा: बनीने आकाशला दिला बाबा म्हणून आवाज, 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेमध्ये नवे रंजक वळण

पत्नीला दिले होते वचन

पुढे ते म्हणाले की, “आमचे लग्न झाले तेव्हा मी सुचित्राला काहीच देऊ शकत नव्हतो. पण, त्यावेळी देखील मी एक इच्छा व्यक्त केली होती. ती म्हणजे, प्रामाणिकपणाच्या जोरावर मी अशी परिस्थिती निर्माण करेन की, कधीच तुला लेबल पाहून वस्तू विकत घ्यावी लागणार नाही. त्यासाठी मी २५ वर्षे मेहनत घेतली. आमच्या संसाराला आता एकूण ३३ वर्षे पूर्ण झाली आहेत. आपण एकदा स्वच्छ कामाचा मार्ग निवडला की, आपल्याला पुन्हा मागे वळून पाहावे लागत नाही.”

IPL_Entry_Point