मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  हिंदू देवस्थानाची बदनामी करण्याचे षडयंत्र; अर्थिक घोटाळ्याचे आरोप होताच आदेश बांदेकर संतापले

हिंदू देवस्थानाची बदनामी करण्याचे षडयंत्र; अर्थिक घोटाळ्याचे आरोप होताच आदेश बांदेकर संतापले

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 29, 2023 09:41 AM IST

Aadesh Bandekar: आदेश बांदेकर यांच्यावर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी आरोप केले होते. त्यानंतर आता आदेश बांदेकर यांनी पोस्ट लिहिली आहे.

आदेश बांदेकर
आदेश बांदेकर (HT)

अभिनेते आणि सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यावर काही दिवसांपूर्वी आर्थिक घोट्याळ्याचा आरोप केला होता. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी आदेश बांदेकर यांच्यावर गंभीर असे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आरोप केले आहेत. अशातच शिवभोजन थाळीसाठी न्यासाने बेकायदेशीरपणे ५ कोटी रुपये दिल्याच्या आरोपावरुन आदेश बांदेकर आणि मनसे नेते यशवंत किल्लेदार यांच्यात देखील चांगलीच जुंपली असल्याचे दिसत आहे.

आदेश बांदेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्व आरोप फेटाळले आहेत. कोणतीही शाहनिशा न करता आरोप केल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. तसेच न्यासाच्या अध्यक्षांना असलेल्या राज्यमंत्री पदाच्या राज्यमंत्री दर्जाचा कधीही गैरफायदा घेतला नाही असा दावा बांदेकर यांनी केला होता.
वाचा: ‘इमर्जन्सी’साठी गहाण ठेवली संपूर्ण संपत्ती? कंगनाने सांगितले सत्य, म्हणाली...

काय आहे आदेश बांदेकर यांची पोस्ट?

"माझ्यावर आणि श्री सिद्धिविनायकांवर तथ्यहिन आरोप करून जगप्रसिद्ध हिंदू देवस्थानाची बदनामी करण्याचे षडयंत्र रचत सवंग प्रसिद्धिसाठी केविलवाणी धडपड करणाऱ्या यशवंत किल्लेदार नामक नक्कलधारी वृत्तीला श्री सिद्धिविनायकांनी खरंच सुबुद्धि द्यावी हिच प्रार्थना .अजूनही मी मर्यादा पाळत आहे" अशी पोस्ट आदेश बांदेकर यांनी केली आहे.

त्याचबरोबर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. अधिवेशनात बोलताना सदा सरवणकर यांनी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या गैरकारभारावर प्रश्न उपस्थित केले होते.

WhatsApp channel

विभाग