Manjummel Boys : खरी मैत्री आणि शौर्याची कहाणी! ‘मंजुम्मेल बॉईज’ने गाजवला ‘इफ्फी’चा मंच
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Manjummel Boys : खरी मैत्री आणि शौर्याची कहाणी! ‘मंजुम्मेल बॉईज’ने गाजवला ‘इफ्फी’चा मंच

Manjummel Boys : खरी मैत्री आणि शौर्याची कहाणी! ‘मंजुम्मेल बॉईज’ने गाजवला ‘इफ्फी’चा मंच

Nov 26, 2024 03:57 PM IST

Manjummel Boys In Iffi : इफ्फीच्या इंडियन पॅनोरमा विभागात प्रदर्शित झालेला‘मंजुम्मेल बॉईज’ हा चित्रपट मैत्री, धाडस, आणि शौर्याची प्रेरणादायी कहाणी सांगणारा आहे.

Manjummel Boys In Iffi
Manjummel Boys In Iffi

Manjummel Boys In Iffi : गोव्यात सुरू असलेल्या ५५व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अर्थात ‘इफ्फी’मध्ये‘मंजुम्मल बॉईज’ या मल्याळम चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. इंडियन पॅनोरमा विभागात प्रदर्शित झालेला हा चित्रपट मैत्री, धाडस, आणि शौर्याची प्रेरणादायी कहाणी सांगणारा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक चिदंबरम यांनी पत्र सूचना कार्यालयाच्या मीडिया सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत चित्रपटाच्या निर्मितीमागील प्रेरणा आणि आव्हानांबद्दल भरभरून सांगितले. हा चित्रपट वास्तविक जीवनातील एका थरारक घटनेवर आधारित आहे, ज्यात केरळमधील कोचीजवळील मंजुम्मल या गावातील ११ तरुणांचा समावेश आहे.

मैत्रीचा कस आणि धाडसाची परीक्षा

या घटनेचा केंद्रबिंदू म्हणजे तामिळनाडूतील कोडाईकनालच्या डेव्हिल्स किचन गुहा. या गुहा अभिनेता कमल हासन यांच्या‘गुना’ या चित्रपटामुळे प्रसिद्ध झाल्या आहेत. मंजुम्मल गावातील या तरुणांनी या ठिकाणी भेट दिली असता, त्यांच्या चमूतील एक सदस्य चुकून गुहेतील खोल घळीत कोसळला. या आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाने त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, त्यानंतर त्यांनी हार मानली.अशा वेळी, चमूतील सिजू डेव्हिड नावाचा तरुण पुढे आला आणि आपल्या मित्राला वाचवण्यासाठी धाडसी मोहीम सुरू केली. हा प्रसंग निस्वार्थी मैत्री, धाडस, आणि अडथळ्यांवर मात करण्याची प्रेरणा देणारा आहे.

Rapper Badshah : बाईकवरून आलेल्या अज्ञातांनी रॅपर बादशहाच्या क्लब बाहेर फेकले बॉम्ब; स्फोटामुळे फुटल्या काचा!

गुहेचे मध्यवर्ती पात्र

चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी सांगितले की, डेव्हिल्स किचन गुहा ही या चित्रपटाची मुख्य पात्र आहे. या गुहांच्या वैशिष्ट्यांचा प्रेक्षकांना अनुभव देण्यासाठी, कोचीमधील एका गोदामात गुहेची प्रतिकृती तयार करण्यात आली.‘माझ्या या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना या गुहेचा गंध आणि वास्तव अनुभवता यावा, यावर माझा भर होता,’असे चिदंबरम म्हणाले.

 

Manjummel Boys
Manjummel Boys

मल्याळम चित्रपटसृष्टीचा प्रवास

चिदंबरम यांनी सांगितले की, ही कथा काही वर्षांपूर्वी चित्रपट माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्या वेळी चित्रपटसृष्टीतील गुंतवणूकदार अशा प्रकारच्या कथांमध्ये रस दाखवत नव्हते. तथापि, गेल्या काही वर्षांत मल्याळम चित्रपटसृष्टीने प्रगती केली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या उदयानंतर, प्रायोगिक कथांना मोठा वाव मिळाला आहे. ‘मंजुम्मल बॉईज’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.चित्रपटाची निर्मिती करताना आलेल्या आव्हानांविषयी चिदंबरम यांनी सांगितले की, गुहा प्रतिकृती तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली.‘गुहेचे बारकावे, तिची रचना, आणि वातावरण साकारण्यात मोठा वेळ आणि कौशल्य खर्ची पडले’, असेते म्हणाले.प्रेक्षकांसमोर मैत्री, धाडस, आणि शौर्याचे नवे पर्व उलगडणारा‘मंजुम्मल बॉईज’ हा चित्रपट ५५व्या इफ्फीचा विशेष आकर्षण ठरला आहे. केरळच्या या अकरा तरुणांच्या कथेमुळे प्रेक्षकांना मैत्रीची नवी व्याख्या अनुभवता आली.

Whats_app_banner